AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युती सरकारनं भरती थांबवल्यानं 4 हजार पदं रिक्त; शिक्षण संस्थांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिलेदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज साऱ्याच आघाडीवर आक्रमक झालेल्या विरोधकांना सोमवारी जोरदार धोबीपछाड देत राज्य सरकारची पाठराखण केली.

युती सरकारनं भरती थांबवल्यानं 4 हजार पदं रिक्त; शिक्षण संस्थांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
| Edited By: | Updated on: Nov 15, 2021 | 1:28 PM
Share

नाशिकः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे शिलेदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज साऱ्याच आघाडीवर आक्रमक झालेल्या विरोधकांना सोमवारी जोरदार धोबीपछाड देत राज्य सरकारची पाठराखण केली. शिक्षण क्षेत्रातल्या अडचणींनाही त्यांनी मागच्या सरकारला जबाबदार धरलं. पवार म्हणाले, मागच्या सरकारनं त्यांच्या कार्यकाळात भरती होऊ दिली नाही. मागच्या सरकारनं संस्था चालकांकडं चमत्कारिक नजरेनं पाहिलं. मागच्या सरकारनं अनेक गोष्टी तशाच ठेवल्या. शिक्षण संस्थांमधलीही भरती थांबवली. त्यामुळं आज 4 हजार पदं रिक्त आहेत. रयत शिक्षण संस्था सध्या अनेक समस्यांना तोंड देते आहे. तेव्हा इतर शिक्षण संस्थाना काय अडचणी असतील, याचा अंदाज येतो. तरीही विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

सरकार दखल घेणार

पवार म्हणाले, शिक्षण विस्तार करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. महाविकास आघाडीतील सिनियर मंत्री छगन भुजबळ आपल्या बरोबर आहेत. त्यांच्या माध्यमातून तुमच्या मागण्या सरकारकडे मांडू. सरकार दखल घेईल, असे आश्वासन पवार यांनी यावेळी दिले. तसेच आपण मंत्री असताना शिक्षकांचं शिष्टमंडळ आपल्या मागण्या घेऊन यायचे. त्यांच्या मागण्या मान्य केल्या की कोट्यवधी रुपयांचे बर्डन येत होतं. याबाबत चव्हाण साहेबांनी मला विचारलं, मंत्रिमंडळात तुम्हाला कोणतं काम करायचं आहे? मी त्यांना सांगितलं शिक्षण खात्यातून माझी सुटका करा, कृषी खातं द्या, हा किस्सा ऐकताच एकच खसखस पिकली.

अनुदान प्रश्नासाठी बैठक

पवार म्हणाले, खासगी शिक्षण संस्थांच्या मागण्या राज्यसरकारकडे मांडाव्या लागतील. शिक्षण संस्थांच्या अनुदानाचा प्रश्न सोडवण्यासाठी नगरविकास, अर्थ मंत्री महामंडळ प्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घ्यावी लागेल. त्यानंतरच हा प्रश्न सोडवावा लागेल. शिक्षण खात्याचा अति हस्तक्षेप नको, अशा काही शिक्षण संस्था चालकांच्या तक्रारी आहेत. त्यांचंही बरोबर आहे. सरकारी हस्तक्षेपाला मर्यादा हव्यात, पण संस्था चालकांनीही तारतम्य ठेवणं गरजेचं आहे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

खासगी संस्थांनी काम वाढवलं

शरद पवार म्हणाले, महाराष्ट्रात शिक्षण विस्ताराची जबाबदारी एका ठराविक वर्गानंतर खासगी शिक्षण संस्थानी उचलली. अनेकांनी शिक्षणसंस्था सुरू केल्या. शिक्षणसंस्था वाढवण्याचं काम केलं. अनेक मान्यवरांनी शिक्षणसंस्था मोठ्या केल्या आणि ज्ञानदानाचं काम केलं. शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करण्याचं काम खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं. वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचं काम ज्योतिबा फुलेंनी केलं. शिक्षणाचा जागर करण्याचं काम खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंनी केलं.

इतर बातम्याः

ST Strike: तुटेल एवढं ताणू नये; एकाच वाक्यात शरद पवारांचा राज्य सरकारला सल्ला!

Malegaon हिंसाचाराची भयंकर साखळीः 1 नगरसेवक, 1 आक्षेपार्ह क्लिप, 4 जणांकडून Viral

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.