झाडाच्या फांदीमुळे पोलिसांच्या गाडीला अपघात, 6 पोलीस जखमी

वर्ध्यात साप्ताहिक परेडसाठी जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

झाडाच्या फांदीमुळे पोलिसांच्या गाडीला अपघात, 6 पोलीस जखमी

वर्धा : आर्वी येथून विरुळ मार्गे वर्ध्यात साप्ताहिक परेडसाठी जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यातील एका जखमी पोलीस अधिकाऱ्यावर अमरावती रुग्णालयात, तर उर्वरित कर्मचाऱ्यांवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

वर्ध्यात काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला झाड्याच्या फांद्या पडल्या होत्या. आर्वी येथून विरुळ मार्गे वर्ध्यात साप्ताहिक परेडसाठी जात असताना रस्त्यावर झाडाची एक फांदी कोसळली होती. या फांदीमुळे गाडीला अपघात होऊ नये या हेतूने चालकाने गाडी थोडी वळवली. मात्र चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. यात पोलीस निरीक्षक संपत चौहान, पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढाले, रवींद्र खेडकर, सुनील मळणकर, सुरेंद्र कांदे, अमोल बडे हे पोलीस अधिकारी जखमी झाले.

दरम्यान सध्या  पोलीस उपनिरीक्षक गोपाल ढाले यांच्यावर अमरावतीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर इतर पोलीस कर्मचाऱ्यांवर सेवाग्राम येथे उपचार करण्यात येत आहे.

या कर्मचाऱ्यांना आर्वी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणेल असता पीएसआय गोपाल ढोले यांना अमरावती तर पोलीस निरीक्षकासह सहा कर्मचाऱ्यांना सेवाग्राम येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *