AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यात GBS आजाराचे 80 टक्के रुग्ण एकाच भागातील, त्या विहीरीने गुढ वाढवले ?

भविष्यात पिण्याच्या पाण्याबाबत उपाययोजना महाराष्ट्रभर करावी लागणार आहे. दूषित पाण्याचा परिणाम शहरावर होत आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या आजाराचे रुग्ण सापडत आहेत. पुण्यात एका विहिरीच्या प्रदूषणामुळे हा आजार पसरला आहे असेही आरोग्य मंत्र्यांनी म्हटले आहे.

पुण्यात GBS आजाराचे 80 टक्के रुग्ण एकाच भागातील, त्या विहीरीने गुढ वाढवले ?
| Updated on: Jan 27, 2025 | 9:32 PM
Share

पुण्यात GBS आजाराने थैमान मांडले आहे. या आजाराचे 80 टक्के रुग्ण पुणे जिल्ह्यातील असून या आजारावरील महत्वाच्या असलेल्या इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. या आजारात मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी असल्याने नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन सरकारने केले आहे. दरम्यान आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज पुण्यातील दिनानाथ मंगेशकर आणि ससून रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाला भेट दिली असून पुणे महानगर पालिकेने याबाबत उपाययोजना केल्या असून इंजेक्शनची सोय केली आहे.

पुण्यात GBS या आजाराचे यापूर्वी अनेक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे भीतीचे काही कारण नाही. या आजारात मृत्यू देखील जास्त होत नाहीत असे तज्ज्ञांचे मत आहे. पुण्यातील किरकिटवाडी, आंबेगाव, नांदेड गाव या भागात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. या आजारावर उपयुक्त असलेल्या इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याने पुणे महानगर पालिकेने याबाबत उपाययोजना केल्या आहेत.आता इंजेक्शनची देखील सोय केली आहे. या आजाराच्या रुग्णांकडून खाजगी रुग्णालयांनी अतिरिक्त पैसे घेऊ नये यावर देखील लक्ष ठेवले आहे असे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.

महात्मा फुले योजनेंतर्गत लाभ

GBS हा आजार उपचार केल्यावर बरा होतो. या आजारात महात्मा फुले योजनेंतर्गत लाभ दिला जाणार आहे. पुणे परिसरात 111 रुग्ण आढळले आहेत. रुग्णात 33 महिला आहेत.  या रुग्णांवर विविध 16 रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासले जात आहेत. पाणी उकळून पिणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. GBS चे अनेक रुग्ण बरे होत आहेत. ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना हा त्रास होतो आहे. पुणे महानगर पालिकेने महत्वाचे निर्णय घेतले आहेत आणि उद्यापासून त्याची अंमलबजावणी  होईल असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

80 टक्के रुग्ण पुण्यातील एकाच भागातील

80 टक्के रुग्ण पुण्यातील एकाच भागातील आहेत. त्या विहीरच्या आसपासचे रुग्ण आहेत. पाणी उकळून पिणे गरजेचे आहे. नागरिकांना संभ्रम निर्माण होतो आहे. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे हा आजार होतो. अख्या पुण्यात एकूण 100 रुग्ण आहेत. खाजगी रुग्णालयांनी आम्हाला माहिती दिली रुग्ण वाढत आहेत. नव्याने समाविष्ट झालेल्या गावामध्ये आजार झाला आहेत. ICU मध्ये रुग्ण जाणार नाहीत.ही आमची जबाबदारी आहे. सर्व रुग्णांना आवश्यक तो सर्व पुरवठा केला जात आहे. रुग्णांसाठी महापालिकाआपात्कालिन help line क्रमांक जारी करणार आहे.

कोणावर कारवाई होणार का?

प्रकाश आबिटकर यांनी आज पुणे शहरातील GBS चे सर्वाधिक रुग्ण सापडले त्या किरकटवाडी, आंबेगाव, नांदेड गाव या भागाला भेट दिली. त्यानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर आणि ससून रुग्णालयातील रुग्णांची त्यांनी भेट घेतली. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हाभरातील सर्व आरोग्य विभागाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. विहीरीतील दूषित पाण्या प्रकरणात  जबाबदार अधिकाऱ्यांवर  कारवाई करण्यात येणार आहे. एकूण रुग्ण किती आणि एकूण इंजेक्शन किती ? आणि या आजाराची इंजेक्शनचे कोणी ब्लॅक मार्केट करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.