AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणेकरांच्या डोक्याचा ताप झालेल्या GBS आजाराबाबत तीन मोठे निर्णय, मुरलीधर मोहळ यांचं ट्विट; प्रशासन लागले कामाला

पुण्यात गीयन बारे सिंड्रोम या विचित्र आजाराने घबराट पसरली आहे. महाराष्ट्रात गीयन बारे सिंड्रोम या दुर्मिळ आजाराच्या रुग्णात वाढ झाली आहे. आतापर्यंत एकूण 73 रुग्ण सापडले असून, यातील 70 रुग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात आहेत, तर 3 रुग्ण इतर जिल्ह्यात आहेत. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही माहिती दिली. या रुग्णांपैकी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणेकरांच्या डोक्याचा ताप झालेल्या GBS आजाराबाबत तीन मोठे निर्णय, मुरलीधर मोहळ यांचं ट्विट; प्रशासन लागले कामाला
| Updated on: Jan 26, 2025 | 2:26 PM
Share

पुण्यात गीयन बारे सिंड्रोम या विचित्र आजाराने घबराट पसरली आहे. या आजाराची पुण्यातील वाढती संख्या पाहाता प्रशासन कामाला लागले आहे. पुण्यात GBS ची लागण झालेल्या आणि सोलापुरात मृत्यू झालेल्या रुग्णाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला जाणार आहे. ‘गीयन बारे सिंड्रोम’ अर्थात जीबीएस या आजाराच्या रुग्णांची पुणे शहरातील वाढती संख्या लक्षात घेता काही महत्त्वाचे निर्णय महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करून घेतले आहेत असे ट्वीट पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांनी केले आहे.

‘गीयन बापे सिंड्रोम’ अर्थात जीबीएस या आजाराच्या रुग्णांची पुणे शहरातील वाढती संख्या लक्षात घेता पुण्याचे खासदार मुरलीधर मोहळ यांनी ट्वीट केले आहे. आपण पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याशी चर्चा करुन काही महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याचे खासदार मुरलीधर यांनी केले आहे.

मुरलीधर मोहळ यांचे ट्वीट नेमके काय ?

१) पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार मिळणार

२) खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना ‘शहरी गरीब’ योजनेचा लाभ देऊन पुणे महापालिकेच्या वतीने २ लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय आर्थिक मदत केली जाणार आहे.

३) कमला नेहरु रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी ‘इम्युनोग्लोब्यूलिन’ हे इंजेक्शन महापालिका मोफत उपलब्ध करून देणार आहे.

पुण्यात GBS ची लागण झालेल्या आणि सोलापुरात मृत्यू झालेल्या रुग्णाचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवला जाणार आहे. या संदर्भातील तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल त्यामुळे लोकांनी घाबरण्याचे काही कारण नाही असे आवाहन सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. एका 40 वर्षे वय असलेल्या या व्यक्तीस पुण्यात GBS ची लागण झाली होती. त्यानंतर तो रुग्ण उपचारासाठी सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाला होता. 18 जानेवारी रोजी सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने या रुग्णास खासगी रुग्णालयात दाखल केले होते.

सुरुवातीला या रुग्णाला ICU मध्ये ठेवण्यात आले होते मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्याला जनरल रूममध्ये हलवण्यात आले. मात्र काल अचानकपणे त्याला श्वास घेण्यात अडचण येत असल्याने पुन्हा एकदा ICU मध्ये हलविण्यात आले होते. परंतू उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास पुण्यात GBS ची लागण झाली होती याची माहिती मिळाल्यानंतर पालिका प्रशासनाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

य़ा रुग्णाचा व्हीसेरा देखील पुढील तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या रुग्णाचा मृत्यूचे नेमके कारण काय ? याबाबतीत प्राथमिक माहिती शवविच्छेदन आणि व्हीसेरा तपासणी अहवालानंतरच प्राप्त होईल असे सोलापूर महानगर पालिकेने म्हटले आहे. मात्र GBS बाबतीत कोणीही अफ़वा पसरवू नये, तसेच लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.

काय काळजी घ्यावी ?

महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने GBS आजाराची लक्षणे आणि नागरिकांनी काय काळजी घ्यावी हे स्पष्ट केले आहे.अचानक पायातील किंवा हातातील येणारी कमजोरी किंवा लकवा, अचानकपणे चालताना होणारा त्रास आणि अशक्तपणा आणि डायरिया (जास्त दिवसांचा) ही तीन लक्षणं असल्याचे म्हटले जात आहे. पिण्याचं पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी, त्यासाठी पाणी उकळून प्यावं. तसेच, अन्न स्वच्छ आणि ताजे असावे, वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा आणि शिजलेलं आणि न शिजलेलं अन्न एकत्र न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल.

आपण या गीयन बारे सिंड्रोमबद्दल म्हणजे काय ?

आपल्या शरीरावर एखाद्या रोगाने हल्ला केला, तर आपली रोगप्रतिकार शक्ती आपल्या शरीराचा त्यापासून बचाव करते. पण गीयन बारे सिंड्रोम या दुर्मिळ आजारात हीच रोगप्रतिकार शक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते. 1961 मध्ये युरोपातल्या Battle of the Somme मध्ये दोन सैनिकांना पक्षाघाताला अटॅक आला होता.. एका विशिष्ट कारणामुळे हा पक्षाघात झाल्याचा निष्कर्ष गीयन, बारे आणि स्ट्रोहल या तीन फ्रेंच लष्करी न्यूरोलॉजिस्टनी काढला होता. याच आजाराला आज गीयन बारे सिंड्रोम (Guillain Barré Syndrome किंवा GBS) म्हटले जाते.

गीयन बारे सिंड्रोम का होतो?

हा आजार अतिशय दुर्मिळ असा आजार आहे. साधारण 78 हजार जणांपैकी एकाला हा सिंड्रोम होतो. आणि तो का होतो, याची सगळी कारणं अजून पूर्णपणे समजलेली नाही. पण बहुतेक प्रकरणांमध्ये एखाद्या विषाणू किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शननंतर हा आजार होतो.

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.