Video | ऐन सणासुदीत.. दापोली समुद्रकिनाऱ्यावर पुन्हा बोट….
ऐन सणासुदीच्या तोंडावर रत्नागिरीत पुन्हा एकदा बोट आढलल्याने काही काळ भीतीचं वातावरण होतं. मात्र तपासाअंती ही बोट संशयास्पद नसल्याचं उघडकीस आलं.
रत्नागिरीः नवरात्र आणि दसरा तोंडावर असताना दापोली (Dapoli) समुद्र किनाऱ्यावर एक बोट आढळल्याने एकच खळबळ माजली. आज सकाळी रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली समुद्र किनाऱ्यावर ही बोट (Boat) आढळल्याने तटरक्षक जवानांनी लगेच तपास सुरु केला. मात्र ही बोट संशयास्पद नाही, असा खुलासा करण्यात आला आहे. विजयदुर्ग किनाऱ्यावर बुडालेल्या पार्थ जहाजाचा लाइफ क्राफ्ट असल्याचं सांगण्यात येत आहे. मागील महिन्यात रायगड येथील हरिहरेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावर संशयित बोट सापडली होती. त्यात काही शस्त्रास्त्रही सापडली होती. त्यानंतर काही दिवस राज्यातील विविध शहरांतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.
Published on: Sep 24, 2022 01:31 PM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

