विधवा महिलेशी केलेल्या कृत्याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही, व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्याही मनात येईल चीड

किरण बाळासाहेब ताजणे, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 31, 2023 | 12:45 PM

नाशिक जिल्ह्यातील वडणेर भैरव पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतापजनक घटना घडली असून कठोर कारवाईची मागणी सोशल मिडियावरून होऊ लागली आहे.

विधवा महिलेशी केलेल्या कृत्याची तुम्ही कल्पनाच करू शकत नाही, व्हायरल व्हिडिओ पाहून तुमच्याही मनात येईल चीड
Image Credit source: Google

उमेश पारिख, टीव्ही 9 मराठी, चांदवड ( नाशिक ) : बारा दिवसांपूर्वी पतीचे निधन झाले होते. पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यामध्ये नातेवाइकांनी आत्महत्या केल्याची नोंदही पोलीस ठाण्यात केली होती. मात्र, पत्नीने पतीची आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केल्यानं संतप्त नातेवाईकांनी संतापजनक कृत्य केलं आहे. यामध्ये पतीच्या नातेवाइकांनी विधवा महिलेच्या तोंडाला काळे फासले, त्यानंतर चपलांचा हार घालून गावात धिंड काढली आहे. आणि त्यानंतर चित्रीकरण केल्याचेही समोर आले आहे. सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या संताप व्यक्त केला जात आहे. नाशिक जिल्ह्यातील वडनेर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीच्या निधन होऊन बारा दिवस झालेले असतांनाच ही संतापजनक घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

नाशिक जिल्ह्यातील वडणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात पीडित विधवा महिलेच्या गाडीचा अपघात झाला होता, त्यात तिच्या हाताला लागलेले होते, त्यामुळे तिच्या पतीने माहेरी सोडले होते.

त्यानंतर काही दिवसांनी पतीने आत्महत्या केल्याची बाब पीडित महिलेला समजली, दशक्रिया विधीसाठी महिला गावात पोहचली होती, मात्र पतीच्या नातेवाइकांनी तिच्या मुलांना मारहाण केली होती.

हे सुद्धा वाचा

याच काळात पतीने माझे पती आत्महत्या करू शकत नाही, त्यांचा घातपात झाला आहे असा संशय निर्माण केला आणि चौकशीची मागणी करू लागली होती, मात्र संतप्त पतीच्या नातेवाइकांनी विधवा महिलेसह मुलांना आणि तिच्या नातेवाईकांना मारहाण केली आहे.

इथवरच हे प्रकरण न थांबता पतीच्या नातेवाइकांनी विधवा महिलेच्या तोंडाला काळे फासले, चपलांचा हारही घातला आणि गावभर धिंड काढली, आणि चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

त्यानंतर पीडित विधवा महिलेच्या नातेवाइकांनी पोलिसांत धाव घेत याबाबत माहिती दिली. तक्रारीनंतर रात्री याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपीचा पोलीस शोध घेत आहे.

नाशिक जिल्ह्यातील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून संताप व्यक्त केला जात असून कठोर कारवाईची मागणी नागरिक करू लागले आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI