AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिल्सचा नाद जीवावर बेतला! दीड वर्षाच्या लेकरानं जीव गमावला, बसमधील २५ जण जखमी

समृद्धी महामार्गावर सतत भीषण अपघात होत असल्याचे ऐकायला मिळते. आज पहाटे एका खासगी बसचा देखील अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका दीड वर्षांच्या चिमुकल्याचा जीव गेला आहे.

रिल्सचा नाद जीवावर बेतला! दीड वर्षाच्या लेकरानं जीव गमावला, बसमधील २५ जण जखमी
Samrudhi MahamargImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 19, 2026 | 9:42 AM
Share

समृद्धी महामार्गावर एका खाजगी लक्झरी बसचा आज, 19 एप्रिल रोजी सकाळी भीषण अपघात झाला. चालक आणि क्लिनर मोबाईलवर रील बनवण्यात व्यस्त असल्याने बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट पलटी झाली. या अपघातात दीड वर्षांच्या एका चिमुकल्याचा मृत्यू झाला, तर २० ते २५ प्रवासी जखमी झाले.

मुंबहून पुसदकडे निघाली होती बस

अपघाताची घटना मेहकर येथील टोलनाका जवळ घडली. मुंबईहून पुसदकडे निघालेली ही खाजगी ट्रॅव्हल्स बस भरधाव वेगाने जात होती. चालक आणि क्लिनर दोघेही मोबाईलवर व्हिडीओ रील बनवत असल्याचे सांगितले जात आहे. याच नादात बसचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्यावर पलटी झाली. बस अचानक पलटी झालेल्या मागून येणारी एक चारचाकी वाहन देखील बस येऊन धडकले. यामुळे चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले.

दीड वर्षांच्या चिमुकल्याचा जीव गेला

अपघात झाल्याचे कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बसमधून नागरिकांना बाहेर काढले. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत केली आणि जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात हलविले. मात्र, मेहकरच्या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने अनेक जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही जखमींवर स्थानिक नागरिकांनी स्वतः थातूरमातूर उपचार केल्याची माहिती आहे. दुर्दैवाने या अपघातात एका दीड वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.

समृद्धी महामार्गावर वेगवान वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वीही अनेक भीषण अपघात घडले आहेत. वाहन चालकांनी मोबाईल वापरताना अतिशय काळजी घेणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. प्रशासनाने अपघाताची चौकशी सुरू केली असून, दोषींवर कायदेशीर कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उत्तम उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही घटना पुन्हा एकदा ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापर न करण्याचे महत्त्व अधोरेखित करते.

शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळके यांचा देखील मृत्यू

नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात यांचे निकटवर्तीय आणि शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळके यांचा देखील समृद्धी महामार्गावर अपघात झाला. छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येत असताना त्यांची कार एक कंटेनरला धडक्याल्यामुळे अपघात झाला. या अपघतात त्यांचा आणि पत्नीचा जागीच मृत्यू झाला.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक