AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साप चावल्यावरही होणार नाही मृत्यू, डॉक्टरांनी सांगितला योग्य मार्ग, अजिबात घाबरून..

पावसाळा म्हटले की, मोठ्या प्रमाणात साप निघतात. आपल्याकडे साप चावला म्हणजे मृत्यू झाला. हे लोकांच्या मनात बसले. मात्र, साप चावल्यानंतर योग्य गोष्टी केल्या तर वाचता येते. साप चावल्यावर काय करावे आणि काय नाही ते जाणून घ्या.

साप चावल्यावरही होणार नाही मृत्यू, डॉक्टरांनी सांगितला योग्य मार्ग, अजिबात घाबरून..
Snake
| Updated on: Jun 06, 2026 | 8:44 PM
Share

पावसाळा म्हटले की, साप चावण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते. विशेष: ग्रामीण भागात साप चावल्याने अनेकांचा मृत्यू होतो. पावसामुळे साप बिळाबाहेर निघतात. त्यांच्या बिळात पाणी जाते. मुळात म्हणजे साप चावल्यानंतर आपल्याकडे अनेक घरगुती उपाय केले जातात आणि तिथेच खरी चूक होते. योग्य माहितीच्या अभावामुळे आणि अंधश्रद्धेमुळे हजारो लोक आजही विनाकारण आपला जीव गमावतात. मुळात म्हणजे साप चावल्यानंतर पहिला एक तास अत्यंत महत्वाचा असतो, त्यावेळी उपचार मिळणे अत्यंत आवश्यक असतात. आपल्याकडे सापाचे विष घरगुती पद्धतीने काढण्यातच तो एक तास घालवला जातो आणि मृत्यू होतो. या पहिल्या तासात रुग्णाला त्वरित रुग्णालयात दाखल करणे, आवश्यक असते. तो एक तास त्याच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो, पण आपल्याकडे तेच होत नाही.

भारतात दरवर्षी साप चावल्याने तब्बल 58,000 मृत्यू होतात. eLife जर्नलमध्ये हा धक्कादायक खुलासा करण्यात आला. लोक अनेकदा साप चावल्यानंतर घरगुती उपाय करतात. ज्यामुळे महत्वाचा वेळ जातो. तोंडाने विष काढणे, जखम डागणे, जखमेवर दोरी बांधनी, औषधी वनस्पती वापरणे. डॉक्टरांनी मोठा इशारा देत सांगितले की, अशा पद्धतीने रुग्णाची प्रकृतीच चांगली होत नाही. उलट हे अंगलट येऊ शकते.

योग्य उपचार करण्यास यामुळे उशीर होतो. यासोबतच साप चावला म्हणजेच आपला मृत्यू होतो, हे देखील चुकीचे आहे. प्रत्येक साप विषारीच असतो, असे अजिबातच नाही. मुळात म्हणजे आपल्याकडे अर्ध्यापेक्षा जास्त लोक साप चावल्यानंतर अधिक भितात. घाबरणे हाच माणसाचा मोठा शत्रू आहे. भीतीमुळे हृदयाचे ठोके वाढतात,  ज्यामुळे विष रक्तप्रवाहात अधिक वेगाने पसरते. साप चावल्यानंतर अधिक घाबरून जाऊ नका.

घाबरून न जाता, रुग्णाला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जा. ज्या ठिकाणी चाप चावला आहे तो भाग शक्यतो जमिनीच्या बाजूने झुकवा. हालचाली कमी करा. साप चावल्यानंतर अजिबातच जखमी पाण्याने धुण्याचा प्रयत्न करू नका. तोडातून विष काढणे म्हणजे पूर्ण मुर्खपणा आहे. जखमेवर बर्फ किंवा इतर गोषी चोळू नका. ज्या व्यक्तील साप चावला आहे, अशाला चहा, कॉफी अजिबात देऊ नका.

एक गोष्ट आयुष्यभराकरिता लक्षात ठेवा. साप चावल्यानंतर मृत्यू हा टाळता येतो. अशावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्वात अगोदर रूग्णालयात धाव घ्या. बाकी सर्व गोष्टी दूर ठेवा. विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला एकमेव उपचार म्हणजे सर्पविषविरोधी औषध. हे औषध वेळेवर दिल्यास पक्षाघात, अंतर्गत रक्तस्राव, मूत्रपिंड निकामी होणे या गोष्टी टाळतात येतात.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली