वय लहान, पण बोलणं मनाला भिडणारं, जेजुरी गडावरील चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल, कोण आहे शुभम..
जेजुरी गडावरील एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओत तो लहान मुलगा गडावर येणाऱ्या नवरदेव नवरीला पूजा करायला लावताना दिसला. त्याची बोलण्याची पद्धत सर्वांनाच आवडत आहे.

tv9 मराठी प्रतिनिधी, विक्रम वारे : अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर सध्या एका चिमुकल्या आवाजाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. जेजुरी गडावरील एका चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसला. या व्हिडीओत तो लहान मुलगा गडावर येणाऱ्या नवरदेव नवरीला पूजा करायला लावताना दिसला. यादरम्यान तो जो काही आणि ज्याकाही पद्धतीने बोलत आहे हे पाहून सर्वजण भारावून गेले. या मुलाचा व्हिडीओ तूफान व्हायरल झाला. पूजा करायला लावण्याची त्याची पद्धत तूफान चर्चेत आली. या मुलाचे नाव शुभम वाघरी असून त्याची राज्यभरात चर्चा होत आहे. जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांना, विशेषतः नवविवाहित जोडप्यांना आपल्या खास आवाजात शुभेच्छा देणारा शुभम सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी भाविकांचीही गर्दी होताना पाहायला मिळत आहे.
शुभम हा शाळेत शिक्षण घेतो. मात्र, शाळा सुटल्यानंतर तो जेजुरी गडावर येतो आणि आपल्या आवाजाच्या माध्यमातून भाविकांचे मनोरंजन करत सेवा बजावतो. त्याच्या बोलण्यातील खास शैली आणि आवाजामुळे काही भाविकांनी त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आणि पाहता पाहता शुभम सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.
या व्हायरल चेहऱ्यामागची परिस्थिती मात्र अत्यंत हलाखीची आहे. शुभमच्या आई-वडिलांकडून सेंट्रींगचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही शुभम शिक्षण घेत आहे आणि मिळेल त्या वेळेत जेजुरी गडावर सेवा करत आहे. तो तेथील नारळ गोळा करतो. मिळेल ती सेवा करतो आणि दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आकर्षिक करतो.
मिळेल ते पैसे घेऊन तो घरी परततो. त्याची लहान भावंडे देखील आहेत. शुभम याने स्पष्ट केले की, तो गडावर शाळेतून आल्यावर जातो. त्यानंतर तो पूजा, गाणे म्हणत लोकांचे मनोरंजन करतो. त्यानंतर ते काही पैसे मिळतात, त्यातून त्याचे घर चालते. शुभम सध्या सोशल मीडियावर तूफान चर्चेचा विषय ठरलाय.
जेजुरी गडावरील शुभमचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.. pic.twitter.com/DSjOdviHqJ
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 11, 2026
