Ranga Rachure : ‘Kolhapur उत्तरची पोटनिवडणूक Aam Aadmi Party ताकदीनं लढणार, ही 2024ची पूर्वतयारी’

Ranga Rachure : ‘Kolhapur उत्तरची पोटनिवडणूक Aam Aadmi Party ताकदीनं लढणार, ही 2024ची पूर्वतयारी’

| Edited By: | Updated on: Mar 18, 2022 | 5:06 PM

कोल्हापूर (Kolhapur) उत्तरची पोटनिवडणूक आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) ताकतीने लढणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे (Ranga Rachure) यांनी दिली आहे. आपकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

कोल्हापूर (Kolhapur) उत्तरची पोटनिवडणूक आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) ताकतीने लढणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे (Ranga Rachure) यांनी दिली आहे. आपकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगा राचुरे यांनी चाचपणी केली आहे. पंजाबमधील यशाने लोकांना नवा पर्याय मिळाला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील लोक आपला स्वीकार करतील, असा दावा रंगा राचुरे यांनी केला आहे. तर कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक ही आमच्यासाठी 2024ची पूर्वतयारी आहे. कोल्हापूर उत्तर निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोल्हापुरात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेदेखील प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी tv9सोबत बोलताना सांगितले. दरम्यान, पंजाब विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.