AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या ऑफरवर अभिजीत दीपकें यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘एका महिन्याआधी…’

केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या ऑफरवर अभिजीत दीपकें यांचं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी या ऑफरवरून सत्ताधाऱ्यांना टोला लागवला आहे.

Abhijeet Dipke : केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या ऑफरवर अभिजीत दीपकें यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'एका महिन्याआधी...'
Image Credit source: ramdas athawale news
| Updated on: Aug 19, 2026 | 10:05 AM
Share

सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. पहिलं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता ‘स्कूल ठीक करो’ अभियान हाती घेतलं आहे. राष्ट्रीय पातळीवर केलेल्या आंदोलनामुळे अभिजीत दीपकेंची देशभर चर्चा होत आहे. जंतरमंतरवरील आंदोलनामुळे घराघरात पोहोचला आहे. याच अभिजीत दीपके यांना थेट केंद्रीय राज्यमंत्री रामदास आवठले यांनी राजकीय ऑफर दिली. आठवलेंच्या ऑफरवर अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांना थेट एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली. त्यांच्या ऑफरवरून दीपकेंनी टोला लगावला आहे. ‘एका महिन्याआधी मी देशविरोधी होतो’, असं म्हणत अभिजीत दीपके यांनी टोला लगावला आहे. दीपके यांनी ही टीका सोशल मीडियावरून केली आहे. यावेळी दीपके यांनी भाजप नेत्यांनी आंदोलकांना देशविरोधी म्हटल्याचा पुरावा सोशल मीडियावर शेअर केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जेन-झीवर भाष्य केलं होतं. जेन-झी तरुणांना देशविरोधी म्हणणे चुकीचे आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. त्याचं समर्थन दीपकेंनी दिलं. तर भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना देशविरोधी आणि दहशतवाद्यांची बी टीम बोलल्याचेही दीपके यांनी सांगतलं.

आठवले काय म्हणाले होते?

काही दिवसांपूर्वी रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेंना मोठी ऑफर दिली होती. आठवले म्हणाले होते, ‘अभिजीत दीपके आंबेडकरवादी आहे. तो अॅक्टिव्ह आणि युवा आहे. त्याने आरपीआयमध्ये सहभागी होण्याविषयी विचार केला पाहिजे. गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, यावर आमचं सरकार विश्वास ठेवते’. यावेळी रामदास आठवले यांनी अभिजीत दीपके यांना एनडीएमध्ये सामील होण्याचीही ऑफर दिली. त्यात दिल्लीच्या जंतरमंतवर विद्यार्थी आंदोलनामुळे सरकार झुकलं होतं. या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. तब्बल एक महिने विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं. अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाची चर्चा देशभर झाली होती. जंतरमंतरवरील आंदोलनानंतरही दीपकेंचं इतर मुद्यांवर आंदोलन सुरू आहे.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...