AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhijeet Dipke : हाच अंबानीचा मुलगा असता तर..अभिजीत दीपकेंचा महाराष्ट्र पोलिसांना सवाल, दोन दिवसांपूर्वी भरभरु कौतुक आणि आज..

Abhijeet Dipke : "महाराष्ट्र पोलिसांनी आमचं हार्ट ब्रेक केलय. दिल्लीत जंतर-मंतरवर जाणार त्याचा खर्च कोण करणार असं विचारलय. आम्ही नेहमी गांधी, आंबेडकरांबद्दल बोलतोय तुम्हाला ही हिंसा वाटते का?" असा सवाल अभिजीत दीपके यांनी विचारला.

Abhijeet Dipke : हाच अंबानीचा मुलगा असता तर..अभिजीत दीपकेंचा महाराष्ट्र पोलिसांना सवाल, दोन दिवसांपूर्वी भरभरु कौतुक आणि आज..
Abhijeet Dipke
| Updated on: Oct 06, 2026 | 12:47 PM
Share

“महाराष्ट्र पोलिसांनी आमचं हार्ट ब्रेक केलय. आमच्या कार्यकर्त्यांना नोटीस आल्या आहेत. जंतर-मंतरवर आंदोलन होणार आहे, तिथे जाऊ नये म्हणून चंद्रपूर पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. दिल्लीत जंतर-मंतरवर जाणार त्याचा खर्च कोण करणार असं विचारलय. आंदोलन हिंसक होणार असं म्हटलय. आता चंद्रपूर पोलिसांना आधीपासून कसं काय माहित आंदोलन हिंसक होणार की यांनी आधीच प्लान करुन ठेवलाय” अशी टीका कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केली. “सोशल मीडियावर एक पोस्ट टाकू नका, ज्याने हिंसा होईल. एक व्हिडिओ दाखवा आम्हाला आम्ही असं केलय. आम्ही नेहमी गांधी, आंबेडकरांबद्दल बोलतोय तुम्हाला ही हिंसा वाटते का?. महाराष्ट्र पोलीस दिल्ली पोलिसांसारखे का वागतायत” असा सवाल अभिजीत दीपके यांनी विचारला.

“चंद्रपूरवरुन दिल्लीला जाण्यासाठी हजार-दीडहजारचं तिकीटही मुलं काढू शकत नाही का?. जंतर-मंतरवर आंदोलनाला जाऊ नका असं सांगता ही हुकूमशाही झालीय. एकीकडे मराठी मुलगा दिल्लीला जाऊन तुम्ही महाराष्ट्र पोलिसांकडून काही शिका असं दिल्ली पोलिसांना सांगतोय आणि महाराष्ट्र पोलीस अशा नोटीस पाठवतायत. आम्ही देशभरात तुमची वाहवाही करतोय. महाराष्ट्र पोलिसांनी स्वाभिमान जपावा. तुम्ही दिल्ली पोलिसांसारखे नाहीयत. जंतर-मंतर चंद्रपूर पोलिसांच्या अंडर कधी आलं?” असा सवाल अभिजीत दीपके यांनी विचारला.

आमदार-खासदारांची मुलं मोर्चामध्ये असती तर?

“तुम्ही कोणाच्या सांगण्यावरुन नोटीस पाठवली. पोलीस अधिकारी अशा ऑर्डर नाही पाठवत. एक-दोन पोलिसांमुळे महाराष्ट्र पोलिसांची बदनामी नाही झाली पाहिजे. तुम्ही असं वागलात तर दिल्ली पोलीस आणि तुमच्यात काही फरक राहणार नाही. आदिवासी मुलं मोर्चा काढतायत. त्या आदिवासी विद्यार्थ्यांवर मुंबई पोलिसांनी दडपशाही केली. गुन्हेगार कमी पडले म्हणून तुम्ही आमच्यावर अशी दडपशाही करताय का?. हाच अंबानीचा मुलगा मोर्चा घेऊन जात असता तर? आमदार-खासदारांची मुलं मोर्चामध्ये असती तर? आदिवासी मुलं आहेत म्हणून असा दबाव टाकताय” अशी टीका अभिजीत दीपके यांनी केली.

Follow Us
पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
India Alliance Morcha : पोलिसांनी विरोधकांचा 'लोकशाही वाचवा' मोर्चा थांबवला; विरोधक ठाम
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार,
ज्ञानेश कुमार हटाव! दिल्लीच्या रस्त्यावर इंडिया आघाडीचा एल्गार, खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार...
दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचा ‘लोकशाही वाचवा’ मोर्चा, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी दिली माहिती
मतदारांच्या हक्कांसाठी SIR का महत्त्वाचं? CM फडणवीसांनी ट्विट करत दिली मोठी अपडेट
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर...
MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांवर घणाघात; थेट म्हणाले...
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्य
पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड! विवेक भिमनवारांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर