पेट्रोल पंपावर जाण्यापूर्वी काळजी घ्या, पेट्रोल भरताना अचानक फोन वाजला अन् बाईक पेटली

Why is mobile phone not allowed in petrol pumps?: डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी आणि प्रमोशनकडून पेट्रोल पंप आणि मोबाईलफोनमध्ये किती अंतर असावे? यासंदर्भात सांगण्यात आले आहे. पेट्रोल पंपापासून 6 मीटरचे अंतर ठेऊन मोबाईल वापरावा, असे सांगण्यात आले आहे. पेट्रोल भरुन पेट्रोल पंप सोडल्यानंतर तुम्ही बिनदिक्कत फोन वापरू शकता.

पेट्रोल पंपावर जाण्यापूर्वी काळजी घ्या, पेट्रोल भरताना अचानक फोन वाजला अन् बाईक पेटली
छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल पंपावर मोबाईलमुळे आग लागली.
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 10:13 AM

मोबाईल वापरताना काळजी घेतली नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते. गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये, पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलू नये, या गोष्टींची खबरदारी घेतली गेली नाही तर धोका निर्माण होतो. छत्रपती संभाजीनगर शहरात अशीच एक दुर्घटना घडली. एक दुचाकीस्वार पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर गेला. त्याचवेळी त्याचा मोबाईवर रिंग वाजली. त्यामुळे दुचाकीने पेट घेतली. नशिब चांगले पेट्रोल पंपावर मोठी दुर्घटना घडली नाही.

काय घडला प्रकार

संभाजीनगर येथील वाळूज परिसरातील बजाज ऑटो गेट समोरील पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरत होता. त्यावेळी अचानक त्याच्या मोबाईल कॉल आला. त्यामुळे रिंग वाजली. तो पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभा होता. त्याचवेळी दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना घडली. परंतु यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी  झालेली नाही. मात्र, गाडीने अचानक पेट घेतल्याने पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. प्रसंगावधान राखत दुचाकीस्वारांनी व पेट्रोल पंपाच्या कर्मचाऱ्यांनी गाडी लोटत लांब नेली. त्यानंतर तातडीने आग विझवली.

पेट्रोल पंपावर फोनवर का बोलू नाही?

पेट्रोल पंपावर कोणी फोनवर बोलत असले तर त्या ठिकाणी असलेले कर्मचारी लगेच फोन ठेवायला सांगतात. तसेच पेट्रोल पंपावर धुम्रपान करु नका, मोबाईल फोन वापरु नका, अशी चेतावणी देणारी चिन्हीही असतात. पेट्रोल पंपावर मोबाईल न वापरण्यामागे कारण मोबाईलमधील इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत. या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे पेट्रोलची वाफ लागलीच पेट घेते. तसेच जवळच्या धातूच्या वस्तूंमध्ये विद्युतप्रवाह निर्माण करू शकते. यामुळे पेट्रोल पंपावर मोबाईल वापरता येत नाही.

पेट्रोल पंप आणि मोबाईलफोनमध्ये किती अंतर असावे

डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी आणि प्रमोशनकडून पेट्रोल पंप आणि मोबाईलफोनमध्ये किती अंतर असावे? यासंदर्भात सांगण्यात आले आहे. पेट्रोल पंपापासून 6 मीटरचे अंतर ठेऊन मोबाईल वापरावा, असे सांगण्यात आले आहे. पेट्रोल भरुन पेट्रोल पंप सोडल्यानंतर तुम्ही बिनदिक्कत फोन वापरू शकता.

Non Stop LIVE Update
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.