AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत मोठी दुर्घटना चालता चालताच व्यक्ती मॅनहोलमध्ये पडला, मॅनहोल का उघडले जातात?

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे,  कुर्ला खैरानी रोडवरील मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे.

मुंबईत मोठी दुर्घटना चालता चालताच व्यक्ती मॅनहोलमध्ये पडला, मॅनहोल का उघडले जातात?
मुंबईतमध्ये व्यक्ती मॅनहोलमध्ये पडून मोठी दुर्घटना Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 02, 2026 | 4:17 PM
Share

मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे,  कुर्ला खैरानी रोडवरील मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडला आहे. या घटनेनं मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. परंतु अजूनही हा व्यक्ती कुठेही सापडलेला नाहीये.  मुंबईत उघड्या मॅनहोलमध्ये डॉक्टर पडल्याची सर्वात मोठी आणि धक्कादायक दुर्घटना २९ ऑगस्ट २०१७ रोजी घडली होती. मुंबईतील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर मुसळधार पावसात साचलेल्या पाण्यातून चालत असताना प्रभादेवी-एल्फिन्स्टन रोडजवळ एका उघड्या मॅनहोलमध्ये वाहून गेले होते, या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान २०१७ नंतर आता  २०२६ मध्ये पुन्हा अशीच एक घटना घडली आहे.

ज्यामध्ये कुर्ला खैरानी रोडवरील मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.  २०१७ ला अशी घटना घडली होती. मात्र या  घटनेनंतर देखील मुंबई महापालिकेला जाग कशी आली नाही?  असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशा उघड्या असलेल्या मॅनहोलमुळे इतरही अपघाताची शक्यता वाढते, दरम्यान हे मॅनहोल का उघडले जातात? आणि मॅनहोल उघडे असेल तर काय काळजी घ्यावी?  असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

मॅन होल का उघडले जातात? 

जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस होतो, त्यावेळी रस्ते जलमय होतात. पालिका प्रशासनाकडून पाण्याचा निचरा करण्याचं काम पंप आणि मॅनहोलच्या माध्यमातून केलं जातं. मॅनहोलमधून पाण्याचा निचरा वेगाने व्हावा सोबतच पाण्यातून आलेला कचरा अडकतो म्हणून मॅनहोलची जाळी काढली जाते. मात्र तिथे असलेल्या पालिका अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त ही जाळी काढण्याची परवानगी कोणालाही नसते. पालिका अधिकाऱ्याच्या व्यतीरिक्त ही जाळी दुसरी कोणी काढल्यास, संबंधित व्यक्तीवर महापालिकेकडून फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो.

मात्र पालिकेकडून मॅनहोल उघडलं जातं तेव्हा तिथे कर्मचारी तैनात असने सक्तीचे आहे. जेव्हा मॅनहोल उघडला जातो तेव्हा SWM विभागाचा कर्मचारी मॅनहोलजवळ असणं अनिवार्य असतं. त्या ठिकाणी मॅनहोल उघडा असल्याचा सूचना फलक देखील लावणं अनिवार्य असतं.

Follow Us
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक