AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! कंटेनरने 20 वाहनांना उडवलं, 4 जणांचा मृत्यू

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. एका ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरने 20 वाहनांना धडक दिल्याचे समोर आले आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखनी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! कंटेनरने 20 वाहनांना उडवलं, 4 जणांचा मृत्यू
Accident
| Updated on: Jul 26, 2025 | 7:19 PM
Share

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. एका ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरने 20 वाहनांना धडक दिल्याचे समोर आले आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखनी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तब्बल 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

ब्रेक निकामी झाल्याने कंटेनरची 20 वाहनांना धडक

समोर आलेल्या माहितीनुसार, ब्रेक निकामी झाल्यानंतर कंटेनरने 20 वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात तीन वाहने पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. इतर वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर जवळपास 15 प्रवासी जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. वीकेंड असल्यामुळे वाहनांची गर्दी आहे. या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे जवळपास 5 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रागा लागल्या असल्याची माहिती समोर आली आहे. खोपोलीजवळ नवीन बोगदा आणि फूडमॉल हॉटेल दरम्यान ही घटना घडली आहे.

मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर अपघात

समोर आलेल्या माहितीनुसार, लोणावळा खंडाळा घाटातून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर कंटेनर ट्रकचा ब्रेक फेल झाला. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व कंटेनर अनियंत्रित झाला. या कंटेनरने पुढे असणाऱ्या अनेक वाहनांना आणि ट्रकला धडक दिली, त्यामुळे या अपघातात बऱ्याच गाड्यांचे नुकसान झाले आहे. खोपोली पोलिस आणि बचाव पथके घटनास्थळी पोहोचली असून मदतकार्य सुरु आहे.

मोठी वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून दररोज दीड ते दोन लाखांहून अधिक वाहने प्रवास करतात. शनिवारी आणि रविवारी या मार्गावर जास्त गर्दी असते. अनेक पर्यटक लोणावळ्यात पर्यटनाचा आनंद घेतल्यानंतर मुंबईकडे परतत आहेत. मात्र हा अपघात झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.