Dhananjay Munde Case : बलात्काराची तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची मागणी

धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करुन ते मागे घेतल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. अशा प्रकारामुळे खऱ्या पीडितांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. त्यामुळे रेणू शर्मा यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. (Renu Sharma Chitra Wagh)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 8:13 AM, 22 Jan 2021
Dhananjay Munde Case : बलात्काराची तक्रार मागे घेणाऱ्या रेणू शर्मांवर कारवाई करा, चित्रा वाघ यांची मागणी

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या गायिका रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. त्यावर आता अनेक प्रतिक्रिया उमटत असून हा सगळा प्रकार धक्कादायक असल्याचं भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करुन ते मागे घेतल्यामुळे समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो. यामुळे खऱ्या पीडितांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल, असे म्हणत रेणू शर्मा यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीसुद्धा चित्रा वाघ यांनी केली. त्या ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होत्या. (action have to be taken against the Renu Sharma demands BJP leader Chitra Wagh)

हे सगळं धक्कादायक, रेणू शर्मांवर कारवाई करा

धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचे आरोप केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. विरोधीपक्ष भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणामुळे मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यातच रेणू शर्मा यांनी आपली तक्रार अचानकपणे मागे घेत हा आमचा कौटुंबिक वाद असल्याचं सांगितलं आहे. मात्र, शर्मा यांच्या तक्रार मागे घेण्यामुळे भाजप नेत्या यांनी रेणू शर्मा यांना धारेवर धरत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. “धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप आमच्यासाठी धक्कादायक होते. त्याबरोबरच रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेतली तेही माझ्यासाठी धक्कादायक आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांना शिक्षा झाली पाहिजे. बलात्कारासारखा गंभीर आरोप करून तो पुन्हा मागे घेणे हा काही खेळ नाही. अशा घटनांमुळे राज्यात चुकीचा संदेश जाऊ शकतो,” असे चित्रा वाघ म्हणाल्या.

राज्यात चुकीचं उदाहरण सेट होऊ देणार नाही

यावेळी बोलताना बलात्कारासारखी तक्रार करुन ती मागे घेणे हा गंभीर प्रकार असल्याचं भाजप चित्रा वाघ म्हणाल्या. अशा प्रकारामुळे खऱ्या बलात्कार पीडितेकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल. समाजात चुकीचा संदेश जाऊ शकतो, असेही वाघ म्हणाल्या. तसेच यावेळी बोलताना वाघ यांनी रेणू शर्मांवर कारवाई करावी अशी आग्रही मागणी केली.

रेणू शर्मांचा आरोप काय?

पार्श्वगायनाच्या क्षेत्रात कारकीर्द घडवण्याच्या आमिषाने, बॉलिवूडच्या मोठ्या मोठ्या दिग्दर्शक-निर्मांत्याशी भेट घडवण्याच्या आमिषाने धनंजय मुंडे यांनी इच्छेविरुद्ध आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले, तसेच माझी बहीण घराबाहेर असतानाही धनंजय मुंडेंनी माझ्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा आरोप रेणू शर्मा यांनी केला होता

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा, रेणू शर्मांकडून बलात्काराची तक्रार मागे

(action have to be taken against the Renu Sharma demands BJP leader Chitra Wagh)