AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेलवर अवैधरित्या दारुसाठा, राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे धडक कारवाई, 65 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल छडवेल रस्त्यालगत असलेल्या हॉटेल नवरंग येथे राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागातर्फे छापा टाकला

हॉटेलवर अवैधरित्या दारुसाठा, राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे धडक कारवाई, 65 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
| Updated on: Dec 07, 2020 | 8:22 PM
Share

धुळे : धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल छडवेल रस्त्यालगत असलेल्या हॉटेल नवरंग येथे राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभागातर्फे छापा टाकला. या कारवाईत वेगवेगळ्या कंपनीची दारुही जप्त करण्यात आली. सदर करवाईतून देशी-विदेशी कंपन्यांच्या दारुसह दोन वाहने असा एकूण 65 लाख 30 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एका आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. (Action of State Excise Department Illegal stock of liquor)

साक्री तालुक्यातील दहिवेल छडवेल रस्त्यालगत असलेल्या हॉटेलवर अवैधरित्या दारु साठा करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथकाला गुप्त माहितीद्वारे मिळाली. या माहितीद्वारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत गोवा राज्यातील निर्मित केलेली रॉयल ब्ल्यू मास्टर, किंगफिशर यासह विविध प्रकारची दारू जप्त करण्यात आली. या कारवाईत दोन वाहनासह एकूण 65 लाख 30 हजार किमतीची मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी मुकेश अरुण चौधरी वय 30 (रा. अनकवाडे) तालुका शहादा यास अटक करण्यात आले. सदर कारवाई आयुक्त कांतीलाल उमाप यांचे आदेशान्वये पोलिस निरीक्षक आर एम फुलझळके, दुय्यम निरीक्षक एसएस रावते, डी. एन. पोटे, जवान शिंदे विठ्ठला हाके, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड यांनी केले आहे.

(Action of State Excise Department Illegal stock of liquor)

संबंधित बातम्या

धुळ्यात कपड्याच्या दुकानात पोलिसांची छापेमारी, तस्करी होणाऱ्या 25 तलवारी जप्त

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.