AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुप्तरोगांवर जालीम इलाजाचा दावा, मुंबईतून 10 भोंदू डॉक्टरांवर मोठी कारवाई

मुंबईत गुप्तरोगांवर उपचार करण्याचा दावा करणाऱ्या 10 बोगस डॉक्टरना क्राइम ब्रँचने जेरबंद केले आहे. या बोगस डॉक्टरांकडे कोणतीही पदवी नसल्याचे उघडकीस आले आहे.

गुप्तरोगांवर जालीम इलाजाचा दावा, मुंबईतून 10 भोंदू डॉक्टरांवर मोठी कारवाई
bogus doctor
| Edited By: | Updated on: Oct 06, 2026 | 10:00 PM
Share

मुंबईत गुप्तरोगावर उपचाराचा दावा करणाऱ्या 10 बोगस डॉक्टरांना मुंबई क्राईम ब्रँचने जेरबंद केले आहे. या डॉक्टरांकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी नसतानाही ते बिनधास्त डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होते. क्राइम ब्रँच युनिट 7 ने मुंबईतील विविध भागात छापा टाकून ही कारवाई केली आहे. मुंबईतील भांडूप, मानखुर्द, कुर्ला, जोगेश्वरी, बोरीवली आणि दहिसर परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईतील गल्लीबोळात दुकान उघडून गुप्तरोगांवर उपचार करण्याचा दावा करणाऱ्या १० बोगस डॉक्टरांच्या मुसक्या क्राईम ब्रँच युनिट सातने आवळल्या आहेत. या बोगस डॉक्टरांकडे कोणतीही वैद्यकीय पदवी किंवा महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी नसतानाही ते डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत होते. मुंबईतील भांडूप, मानखुर्द, कुर्ला, जोगेश्वरी, बोरीवली आणि दहिसर परिसरात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचने मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत एकत्र येत ही संयुक्त कारवाई केली आहे. सर्वसामान्य आजारांसह गुप्तरोगांवरही बोगस डॉक्टरांकडून उपचाराचा दावा केला जात होता. हे भोंदू डॉक्टर विविध उपचार प्रणालींचा बिनधास्त वापर करत होते. अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानी पद्धतीने ते रुग्णांवर उपचार करत होते. हे डॉक्टर उपचाराच्या नावाखाली रुग्णांकडून मोठी फी घेत होते. काही क्लिनिकमध्ये मुदतबाह्य आयुर्वेदिक आणि युनानी औषधांचा साठा सापडला आहे.या औषधांची विक्रीही केली जात असल्याचे कारवाईत उघड झाले आहे. या छापेमारीत औषधांच्या बाटल्या, सिरिंज, अँटिबायोटिक गोळ्या आणि वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले आहेत. सुमारे 2 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी भांडूप पोलीस ठाण्यात महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट, 1961 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून बोगस डॉक्टरांच्या नेटवर्कचा आणखी विस्तार आहे का, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणात अटक केलेल्या डॉक्टरांची चौकशी सुरु आहे. त्यांनी किती जणांची फसवणूक केली याचीही माहिती घेतली जात आहे.

पकडलेले 10 बोगस डॉक्टर

  • शेख मोहम्मद अन्वर मोहम्मद अस्लम आणि मो. नबी हुसेन मो. फरीद शेख : संतोष हेल्थ क्लिनिक, भांडूप
  • इम्रान अब्दुल जब्बार खान : विनायक हेल्थ क्लिनिक, भांडूप
  • दयाशंकर हुबलाल सिंग आणि जुनेद रहमतुल्लाह सिद्दीकी : हमदम दवाखाना, जोगेश्वरी
  • शहाबुद्दीन निजामुद्दीन शेख : कोहिनूर दवाखाना, जोगेश्वरी
  • डॉ. जावेद जाहेद खान आणि डॉ. रशिद हुसेन बेग : अंकुश आयुर्वेदिक दवाखाना, बोरीवली
  • रशिद हुसेन अफजल हुसेन शेख : दीपक हर्बल हेल्थ केअर क्लिनिक, दहिसर
  • निहाल अराफत हुसेन शेख : समर आयुर्वेदिक दवाखाना, मानखुर्द

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?