AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उदयनराजेंच्या इशाऱ्यानंतर पुण्यात वातावरण तापलं, पोलीस अलर्ट मोडवर, राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर बंदोबस्तात वाढ

राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर उदयनराजे यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

उदयनराजेंच्या इशाऱ्यानंतर पुण्यात वातावरण तापलं, पोलीस अलर्ट मोडवर, राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर बंदोबस्तात वाढ
| Updated on: Feb 05, 2025 | 5:24 PM
Share

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवरायांनी आग्रा येथून सुटका करताना औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिल्याचं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं आहे. या वक्तव्यानंतर राज्यभरात संतापाची लाट आहे. छत्रपतींचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे. ‘राहुल सोलापूरकर यांना गोळ्या घालूनच मारलं पाहिजे, सोलापूरकर जिथे दिसेल तिथे ठेचा आणि त्याला गाडा असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

राहुल सोलापूरकर यांच्या घराची सुरक्षा वाढवली

राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.  शिवरायांनी आग्रा येथून सुटका करताना औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिल्याचं वादग्रस्त वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी केलं आहे. यामुळे राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळत आहे. उदयनराजे यांनी देखील राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत चांगलाच संताप व्यक्त केला आहे.  ‘राहुल सोलापूरकर यांना गोळ्या घालूनच मारलं पाहिजे, सोलापूरकर जिथे दिसेल तिथे ठेचा आणि त्याला गाडा, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. दरम्यान उदयनराजे यांच्या या इशाऱ्यानंतर आता पुणे पोलीस अलर्ट मोडमध्ये आले असून, पुण्यात बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेरील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

नव्या वादाला तोंड

राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं असून, राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, त्यानंतर आता उदयनराजे यांनी देखील चांगलाच संताप व्यक्त केला आहे. ‘राहुल सोलापूरकर यांना गोळ्या घालूनच मारलं पाहिजे, सोलापूरकर जिथे दिसेल तिथे ठेचा आणि त्याला गाडा,’  असं त्यांनी म्हटलं आहे. उदयनराजे यांच्या इशाऱ्यानंतर आता राहुल सोलापूरकर यांच्या घरा बाहेर  बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!