MPSC अध्यक्ष विवेक भिमनवार रजेवर; अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कुणाकडे? अखेर नाव जाहीर, मोठी अपडेट समोर
Satish Waghole News: एमपीएससीच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोलेकडे सोपवला आहे.

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. अनेक मागण्यासाठी त्यांनी आंदोलनाचे शस्त्र उगारले होते. त्यातील मुख्य मागणी होती की, एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांचा राजीनामा. अखेर विवेक भिमनवार यांनी ट्विट करत चौकशी होईपर्यंत या पदावरून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता या पदाचा कार्यभार कोण सांभाळणार, अशी चर्चा होत होती. मात्र आता याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. एमपीएससीच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोलेकडे दिला जाणार आहे. ते नेमके कोण आहेत, याबाबत माहिती आता समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार हे चौकशी होईपर्यंत सध्या रजेवर आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सतीश वाघोले हे एमपीएससीचे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. एमपीएससी आयोगाने घेतलेल्या परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या न्यायालयीन चौकशीअंती विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांना रजेवर पाठवण्यात आले. राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य सतीश वाघोळे यांचे नाव प्रभारी अध्यक्ष म्हणून प्रस्तावित केले होते. यानंतर एमपीएससी आयोगाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. महायुती सरकारला स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती हवी असल्याने त्यांनी प्रभारी अध्यक्ष म्हणून वाघोळे यांचे नाव प्रस्तावित केले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अलीकडील पेपरफुटीसाठी जबाबदार असल्याच्या आरोपांनंतर दोन आठवड्यांपूर्वी माजी सचिव महेंद्र हरपाळकर यांना त्यांच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात आले होते. सरकारने मुंबई उपनगरीय जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना एमपीएससी सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभारही दिला आहे. मंत्रालय संवर्गातील सहसचिव दर्जाचे अधिकारी असलेले हरपाळकर डिसेंबर २०२५ पासून एमपीएससीमध्ये प्रतिनियुक्तीवर होते.
११ सप्टेंबर रोजी आयोगाने घेतलेल्या परीक्षांमधील कथित अनियमिततेच्या निषेधार्थ नागरी सेवा इच्छुकांनी त्यांचा चेहरा काळा केला. सामान्य प्रशासन विभागातील सूत्रांनी सांगितले की, किमान १० अधिकाऱ्यांना विचारणा करूनही एकही अधिकारी एमपीएससीमध्ये सचिव म्हणून रुजू होण्यास तयार नव्हता. अखेरीस कटियार यांना एमपीएससी सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला, असे त्यांनी सांगितले.
