AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin : लाडक्या बहिणींची सर्वात मोठी चिंता मिटली, 1500 रुपयांबाबत सरकारचा थेट निर्णय!

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सध्या केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे. आता सरकारने या योजनेबाबत मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता लाडक्या बहिणींची चिंता मिटणार आहे.

Ladki Bahin : लाडक्या बहिणींची सर्वात मोठी चिंता मिटली, 1500 रुपयांबाबत सरकारचा थेट निर्णय!
ladki bahin yojana
| Updated on: Nov 12, 2025 | 5:57 PM
Share

Ladki Bahin Yojana KYC : राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे लाखो महिलांना लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात महिन्याला 1500 रुपयांची मदत पाठवली जाते. याच पैशांचा महिलांना चांगलाच आधार मिळतो. सध्या राज्य सरकारने सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी संकेतस्थळही देण्यात आले आहे. मात्र ही केवायसी करताना अनेक अडचणी येत आहेत. याच अडचणी दूर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच आता महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी सर्वच लाडक्या बहिणींना महत्त्वाची माहिती दिली आहे. या माहितीनुसार आता राज्यभरातील लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आदिती तटकरे यांनी काय माहिती दिली?

आदिती तटकरे यांनी सध्या सुरू असलेल्या केवायसीच्या प्रक्रियेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडके बहीण योजनांमध्ये वेबसाईटमध्ये काही बदल होत आहेत, त्यामुळे वेळ लागत आहे. ज्या महिलेला पती आणि वडील नाही त्यांना केवायसी करता येत नाहीये. हीच अडचण लक्षात घेऊन आता संकेतस्थळात महत्त्वाचे बदल केले जात आहे. या बदलांमुळे आता सर्व महिलांना केवायसी करता येईल. त्यासाठीच हे बदल केल जात आहेत, असे तटकरे यांनी सांगिले आहे.

संकेतस्थळात करण्यात येत आहे बदल

सध्या केवायसी करताना खूप अडचण येत आहे. या तांत्रिक अडचणीवरही तटकरे यांनी भाष्य केले आहे. महिलांना येत असलेली तांत्रिक अडचण लक्षात घेण्यात आले आहेत. सध्या संकेतस्थळात काही बदल करण्यात येत आहेत. हे बदल झाल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही. लगेच केवायसीची प्रक्रिया पूर्ण होईल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

सरकार केवायसीची मुदत वाढवून देणार का?

दरम्यान, केवायसी करण्याची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकरच ही केवायसी करण्यासाठी महिला प्रयत्नरत आहेत. सध्ये संकेतस्थळात बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे भविष्यात केवायसी करण्यासाठीची मुदत वाढवली जावी, अशी मागणी केली जात आहे. ही मागणी राज्य सरकार मान्य करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक