AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आदित्य ठाकरे यांचा दोन दिवस कोकण दौरा, खळा बैठकीतून जनतेशी साधणार संवाद

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचा गुरुवारपासून दोन दिवसांचा कोकण दौरा सुरू होणार आहे. तेथे ते कोकणवासीयांशी खळ्यामध्ये बसून संवाद साधणार आहेत.

आदित्य ठाकरे यांचा दोन दिवस कोकण दौरा, खळा बैठकीतून जनतेशी साधणार संवाद
aditya thackeray
| Updated on: Nov 22, 2023 | 12:39 PM
Share

कणकवली | 22 नोव्हेंबर 2023 : शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचा गुरुवारपासून दोन दिवसांचा कोकण दौरा सुरू होणार आहे. तेथे ते कोकणवासीयांशी खळ्यामध्ये बसून संवाद साधणार आहेत. जिल्ह्यात पक्ष वाढीसंदर्भात खळा बैठकीच्या माध्यमातून ते पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कोकणातील जनतेशी संवाद साधतील अशी माहिती मिळत आहे.

आदित्य ठाकरेंच्या या झंजावाती दौऱ्यामुळे शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झालं आहे. दोडामार्ग ते नागोठणे दरम्यान हा दौरा होणार असून त्यादरम्यान खळा बैठकांचही आयोजन करण्यात आलं आहे. कोकणातील घराचं वैभव म्हणजे खळं. त्याच खळ्यात बसून आदित्य ठाकरे हे लोकांशी संवाद साधतील, त्यांचे प्रश्न जाणून घेतील.

यासदंर्भात एक प्रसिद्धी पत्रकही जारी करण्यात आले आहे. गुरुवार, 23 नोव्हेंबर आणि शुक्रवार, 24 नोव्हेंबर असे दोन दिवस ते कोकण दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते कोकणातील खळा बैठकांना उपस्थित राहणार आहेत. त्या बैठकांमध्ये ते कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांशी संवाद साधतील.

त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे :

गुरुवार, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता दोडामार्ग येथे लीना कुबल यांच्या घरी बैठक होईल. तर दुपारी 12.25 वाजता सावंतवाडी येथे चंद्रकांत कासार यांच्या घरी आणि दुपारी दीड वाजता कुडाळ येथे मंदार शिरसाट यांच्या घराच्या खळ्यात बैठक होणार आहे.

तर दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, अर्थात शुक्रवार, 24 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता कुडाळ बांबार्डे येथे स्नेहा दळवी यांच्या घराच्या खळ्यामध्ये आदित्य ठाकरे हे सर्वांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 च्या सुमारास ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. आणि सायंकाळी 4 वाजता कणकवली येथून राजापूरला प्रयाण करतील, असे युवासेनेकडून कळवण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकींचा आढावा घेणार

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात आदित्य ठाकरे लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. तसेच विधानसभा मतदारसंघांचाही आढावा घेणार आहेत. याशिवाय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना निवडणुकीचा कार्यक्रम दिला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. नारायण राणे यांच्या बालेकिल्ल्यातच आदित्य ठाकरे येणार असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र

दरम्यान भाजपा आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावरही त्यांनी टीका केली. “फिल्म फेस्टिवल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळा बैठका ह्याच काय साम्य आहे. सिंधुदुर्ग तो बहाना है. पेंग्विनको गोवा मे बॉलिवूड के Actors के साथ नाचना है” अशा शब्दात त्यांनी टीकास्त्र सोडलं.

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा