AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ताबडतोब सेव्ह करा मोबाईलमध्ये हे नंबर… पावसाच्या थैमानात प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी..

Rain warning : राज्यात पावसाने थैमान घातले. त्यामध्येच आता मोठा इशारा देण्यात आला. आज अनेक भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसा अलर्टही जारी करण्यात आला. प्रशासनाकडून काही हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले.

ताबडतोब सेव्ह करा मोबाईलमध्ये हे नंबर... पावसाच्या थैमानात प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी..
Rain warning
| Updated on: Jul 04, 2026 | 7:52 AM
Share

भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा अलर्ट जारी केला. रेड अलर्टसोबतच ऑरेंजही अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे येथे पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केला. अनेक भागात अतिमुसळधार पावसाला सुरूवात झाली. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. अनेक नद्यांची पातळी वाढली आहे. 4 ते 6 जुलै पर्यंत मुसळधार पाऊस कायम असणार आहे. त्यातच आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. विक्री पाऊस होण्याचा अंदाज आहे. यादरम्यानच सीएमओ कार्यालयाकडून हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले. 4 ते 6 जुलै दरम्यान मुंबई एमएमआर, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई शहरासह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये 4 ते 6 जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाट परिसरातही या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या कालावधीत स्थानिक प्रवासात अडथळे आणि काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी या काळात सतर्क राहावे. विशेषतः सखल भागांमध्ये आणि घाट रस्त्यांवर प्रवास करताना अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक आपत्कालीन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात येत आहे. बृहृन्मुंबई महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 1916, पालघर हेल्पलाईन क्रमांक – 02525 297474, +91 82379 78873, ठाणे महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 022-25364779, 0222530 1740, 91 93723 38827 ठाणे, आपत्ती व्यवस्थापन कक्ष – 1800-222-108/8657887101 पनवेल महानगरपालिका हेल्पलाईन क्रमांक – 02227458040/41/42

जर या पावसादरम्यान कोणी कुठे अडकले तर तात्काळ या संपर्क क्रमांकावर नागरिकांनी कॉल करावा. प्रशासनाकडून तुम्हाला तात्काल मदत पोहोचवली जाईल. काही सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली. प्रशासनाचे या परिस्थितीवर बारीक लक्ष आहे. पुढील काही दिवस हाहाकार माजवणारे आहेत. याच पार्श्वभूमीवर मुलांच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

Follow Us
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया
मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा...
Mumbai | मॅनहोल मृत्यू प्रकरण तापलं! अमित साटम यांना पदावरून हटवा; संदीप देशपांडेंचा भाजपवर घणाघात
काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? ठाकरेंच्या आंदोलनावर...
Breaking | काँग्रेससोबत गेलात तेव्हा हिंदुत्व कुठे होतं? उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनावर उदय सामंतांचा घणाघात!
धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! अन् पुढे जे झालं....
Tree Collapse Mumbai | धावत्या स्कूटरवर कोसळलं नारळाचं झाड! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; निष्काळजीपणामुळे आणखी एकाचा बळी
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला जीव
हृदयद्रावक घटना! घरासमोर खेळत होता... उघड्या खड्ड्याने घेतला 2 वर्षांच्या सोहमचा जीव
मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
ब्रेकिंग! मुसळधार पावसाचा कहर; नवी मुंबईतील दुपारच्या सत्रातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर
पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय
Rain Update | पुणे-रायगडमध्ये पावसाचा हाहाकार! हवामान विभागाचा रेड अलर्ट; रस्ते जलमय