AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tukaram Mundhe : अन्नपदार्थात भेसळ? एका कॉलवर तक्रार करा, तुकाराम मुंढे करतील कारवाई

IAS Tukaram Mundhe : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर अन्नभेसळ खोरांवर जोरदार कारवाई सुरु केली आहे.

Tukaram Mundhe : अन्नपदार्थात भेसळ? एका कॉलवर तक्रार करा, तुकाराम मुंढे करतील कारवाई
IAS Tukaram Mundhe
| Updated on: Jun 05, 2026 | 9:26 PM
Share

Tukaram Mundhe : महाराष्ट्रात अन्न भेसळीच्या विरोधात कर्तव्य कठोर अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन ( एफडीए ) आयुक्त म्हणून चार्ज घेताच कारवाईचा धडाका लावला आहे. त्यामुळे सर्वत्र अन्न पदार्थांत भेसळ करुन पैसे कमावण्यासाठी लोकांच्या जीवाशी कसे खेळले जात आहे याचे धक्कादायक पुरावे जनते समोर येऊ लागले आहेत. गेल्या सहा दिवसातच राज्यात २०३ हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले असून तब्बल १०२ भेसळखोरांना अटक करण्यात आली आहे. या ६८ दुकानांवर आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात येऊन त्यांना टाळे लावण्यात आले आहेत.

अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी कार्यभार हाती घेतला आहे. त्यानंतर त्यांनी एफडीचे आयुक्त म्हणून धडाकेबाज कारवाई केली आहे. प्रतिबंधित गुटखा, पानमसाले, दुध आणि पनीर, मिठाई, खवा यांची साठवणूक करणाऱ्या विरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहे. तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्राचे एफडीए आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जनतेचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी Safe Food, Safe Drugs, Safe Maharashtra असे ब्रीद आखत काम सुरु केले आहे.

लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कायद्यापासून लपता येणार नाही असा स्पष्ट इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.आता कोणत्याही खाद्य पदार्थात जर भेसळी विषयीची तक्रार नागरिकांना करायची असेल तर त्यांना या तक्रारी थेट प्रशासनात पोहचता येणार आहे.यासाठी एफडीएने टोल – फ्री क्रमांक आणि ईमेल जाहीर केला आहे. या वर नागरिकांना त्यांची तक्रार करता येणार आहे.

गेल्या काही महिन्यात अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई कमी केली होती, तसेच या खात्यावर चालढकल आणि लाचखोरीचे देखील आरोप झाले होते. या पार्श्वभूमीवर २५ मे रोजी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती एफडीएचे आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. २५ मे रोजी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्न भेसळीविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरु करण्यात आली आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावर कारवाई

आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ मे रोजी धुळे येथे मोठी कारवाई झाली. महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा आणि तंबाकूयुक्त पदार्थाच्या वाहतूक रोखत एफडीएने १८ लाख ५० हजाराचा अवैध गुटखा जप्त केला आहे. मुंबई – आग्रा महामार्गावर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात वाहन चालक सुरेश कुमारे गोवरिया ( राजस्थान ) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

तुकाराम मुंढे हे अत्यंत तडफदार, कठोर आणि कर्तव्यतप्तर आयएएस ( IAS ) अधिकारी आहेत यांच्या २१ वर्षांच्या कार्यकाळात त्यांच्या २५ वेळा बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्या धडाडीमुळे आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातील कठोर कारवाईमुळे अनेकांचे हितसंबंध दुखाव्याने त्यांच्या वारंवार बदल्या केल्या जातात.

तुकाराम मुंढे हे डॅशिंग आणि शिस्तप्रिय आयएएस ( IAS ) अधिकारी आहेत. २१ वर्षांच्या प्रशासकीय कारकिर्दीत तब्बल २५ वेळा त्यांची बदली झाली आहे. त्यांच्या कामाच्या धडाडीमुळे आणि भ्रष्टाचाराविरोधातील कठोर कारवाईमुळे त्यांना वारंवार या बदल्यांचा सामना करावा लागला आहे.

अन्नातील आणि औषधातील भेसळीच्या तक्रारासाठी टोल फ्री नंबर-

टोल फ्री क्रमांक : 1800222365 ई-मेल : jc-foodhq@gov.in

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली