AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदारकी, खासदारकी 100 वेळा…दानवेंना तिकीट मिळताच सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ

नुकताच महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांना विधानपरिषदेचे तिकिट देण्यात आले. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

आमदारकी, खासदारकी 100 वेळा...दानवेंना तिकीट मिळताच सुषमा अंधारेंनी पोस्ट केला व्हिडीओ
Sushma AndhareImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 29, 2026 | 5:05 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून राज्यात विधान परिषद निवडणुकीबाबात वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. भाजपने यादी जाहीर केल्यानंतर ठाकरे गटानेही आपला उमेदवार जाहीर केला आहे. ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा अंबादास दानवे यांना विधान परिषदेचे तिकिट देण्यात आले आहे. सकाळपर्यंत या तिकिटासाठी ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, अंबादास दानवे यांचे नाव जाहीर करताच सुषमा अंधारे यांनी शेअर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

काय आहे सुषमा अंधारे यांची पोस्ट?

विधान परिषदेसाठी ठाकरे गटातून खुद्द उद्धव ठाकरे यांनी अर्ज दाखल करावा असा आग्रह महाविकास आघाडीकडून करण्यात आला होता. पण, आज महाविकास आघाडीकडून अंबादास दानवे यांना तिकिट देण्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना ओवाळतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी ‘आमदारकी खासदारकी आपल्या वरून 100 वेळा कुर्बान’ असे कॅप्शन दिले आहे.

अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया काय?

विधानपरिषदेचे तिकिट मिळताच अंबादास दानवे यांनी आनंद व्यक्त केला. होते. ते म्हणाले, उद्धव जींनी सभागृहात जावं अशी आमच्या सगळ्या नेत्यांची भूमिका होती. पण त्यांनी एका सामान्य शिवसैनिकाला पुन्हा सभागृहात जाण्याची संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मला वाटते. निश्चितच मी उद्धव जींचा, पक्षाचा आणि शिवसेना प्रमुखांच्या विचाराने चालण्याचा आम्ही जो संकल्प केला मला असे वाटते त्याच विचाराचा हा विजय आहे. निष्ठा तर ठेवली पाहिजे. फळ म्हणायला गेलो तर ह्याच्या आधीही मी सभागृहात होतो. विरोधी पक्ष नेता होतो. निष्ठा तर ठेवली पाहिजे. परंतू सामान्य शिवसैनिकाला उद्धवजींनी त्यांची जागा दिली हे सगळ्यात महत्त्वाचे आहे.

भाजपचे उमेदवार कोण?

भाजपाने यावेळी माधवी नाईक, सुनिल कर्जतकर, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांना विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. तर विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.

काँग्रेसचे उमेदवार कोण?

विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसची देखील संभाव्य यादी समोर आली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात, सचिन सावंत, अतुल लोंढे, नसीम खान आणि राजेश राठोड यांच्या नावांचा समावेश आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा