AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayodhya Hindutva Politics : राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचा धसका? आदित्य ठाकरे मे महिन्यात अयोध्येला जाण्याच्या तयारीत

Ayodhya Hindutva Politics : भोंग्याचा मुद्दा उचलून प्रखर हिंदूत्ववादाचा पुरस्कार केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता अयोध्येला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्याने राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

Ayodhya Hindutva Politics : राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचा धसका? आदित्य ठाकरे मे महिन्यात अयोध्येला जाण्याच्या तयारीत
राज ठाकरेंच्या हिंदुत्वाचा धसका? आदित्य ठाकरे मे महिन्यात अयोध्येला जाण्याच्या तयारीतImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 17, 2022 | 4:27 PM
Share

मुंबई: भोंग्याचा मुद्दा उचलून प्रखर हिंदूत्ववादाचा पुरस्कार केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता अयोध्येला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरे (raj thackeray) यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्याने राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच राज ठाकरे येणाऱ्या महापालिका लढवणार असल्याचे संकेतही मिळत आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ माजली असून त्यामुळेच राज ठाकरे यांच्या दौऱ्या आधीच आदित्य ठाकरे (aaditya thackeray) आयोध्येचा दौरा करणार असल्याचं सांगितलं जातं. त्यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊतही जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतल्याने त्याचा शिवसेनेने धसका घेतल्यानेच शिवसेनेची (shivsena) ही अयोध्यावारी असल्याचं सांगितलं जात आहे. कोणत्याही परिस्थितीत आपली हिंदुत्वावादी प्रतिमा कायम राहावी आणि हिंदुत्ववादी व्होटबँक राज ठाकरे यांच्याकडे सरकू नये म्हणून शिवसेनेचा खटाटोप सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे.

कोण कधी जाणार अयोध्येला?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यानी येत्या 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली आहे. अयोध्येला जाऊन मी श्री रामाचं दर्शन घेणार आहे. तुम्हीही या असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर, आदित्य ठाकरे हे मेमध्येच अयोध्येला जाण्याच्या तयारीत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जबाबदारी आधी शिवसेनेकडे होती. मात्र, आता युवा सेनाही ही तयारी करत असल्याचं सांगितलं जात आहे. संपूर्ण अयोध्या परिसर भगवामय करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हिंदुत्वाचा धसका घेतलाय?

मनसेची स्थापना झाली तेव्हा राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा हाती घेतला होता. हा मुद्दा राज ठाकरे यांनी आपल्या वक्तृत्व शैलीने प्रभावीपणे मांडला होता. मनसे सैनिकांनी सुरुवातीच्या काळात परप्रांतियांना फटकावलंही होतं. त्यामुळे देशभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यावेळी शिवसेनेच्या हातून मराठीचा मुद्दा निसटतो की काय अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर झालेल्या महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुकीत मनसेला मोठं यश मिळालं होतं. मात्र, नंतर त्यांची घसरण सुरू झाली. मराठीचा मुद्दाही प्रभावी राहिला नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी विकासाचा मुद्दा पुढे केला. विकासाची ब्लू प्रिंट तयार केली. पण राज ठाकरे यांना ही ब्लू प्रिंट प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मतदारांनी संधीच दिली नाही. सतत निवडणुकीत येणाऱ्या अपयशामुळे राज ठाकरे यांनी आता थेट हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. धार्मिक ध्रुवीकरण करून व्होट बँक निर्माण करण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. त्यासाठीच ते हिंदुत्ववादी प्रतिमा ठळक करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. एकीकडे शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष राहिला नाही हे ठसवण्यात भाजप यशस्वी झालेली असतानाच आता मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्याने शिवसेनेची स्पेस मनसे घेणार की काय असं चित्रं निर्माण झालं आहे. त्यामुळेच राज यांच्या हिंदुत्वाचा शिवसेनेने धसका घेतल्याचं सांगितलं जात आहे.

युतीसाठी हिंदुत्वाकडे?

राज ठाकरे यांनी परप्रांतीय मुद्दा सोडला तरच त्यांच्याशी युती होऊ शकते असं भाजपने वारंवार स्पष्ट केलं आहे. त्यामुळे परप्रांतीय मुद्द्यावरून हिंदुत्ववादी अशी इमेज तयार करण्यासाठी राज यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्याचं सांगितलं जात आहे. भोंगे प्रकरण आणि अयोध्येचा दौरा हा त्यातीलच एक भाग असल्याचं सांगण्यात येतं. राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी अशी प्रतिमा तयार केल्यानंतर त्यांच्याशी युती करण्यास भाजपलाही अडचण राहणार नाही. मनसेलाही भाजपशी युती करून राजकारणात आपली स्पेस निर्माण करणं सोपं जाणार आहे. त्यामुळेच राज ठाकरे हे हिंदुत्वाकडे जात असल्याचं सांगितलं जात आहे.

संबंधित बातम्या:

Sanjay Raut: दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा डाव, संजय राऊत यांचा मोठा आरोप

Raj Thackeray : अशा “लवंड्यांना” म्हणत राज ठाकरेंकडून संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर, भोंग्यांवरूनही पुन्हा बजावलं

Sharad Pawar: ‘आळशी माणसांचा भर उसावर’ एका वाक्यात शरद पवारांनी सांगितले अतिरिक्त उसाचे कारण अन् शेतकऱ्यांना मोलाचा सल्लाही..!

कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले...
कुऱ्हाडीचा दांडा आपलीच लोक होत आहेत, उद्धव ठाकरे भावूक होत म्हणाले....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा....
माझ्या डॉक्टरने पक्ष बदलला की काय ? राज यांच्या वक्तव्याने एकच हशा.....
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे
'माझ्यासाठी ते पक्ष सोडणं नव्हतं, माझ्यासाठी...,'काय म्हणाले राज ठाकरे.
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.