AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Santosh Deshmukh Case : ‘बदला घेणं, तेवढी एकच गोष्ट..’, फोटो पाहिल्यावर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

Santosh Deshmukh Case : फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री अजित पवारांना भेटले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल अशी चर्चा आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं. "नुसत्या राजीनाम्याने होणार नाही. धनंज मुंडेवर 302 लावून त्याला पण जेलमध्ये टाका.

Santosh Deshmukh Case : 'बदला घेणं, तेवढी एकच गोष्ट..', फोटो पाहिल्यावर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया
Manoj Jarange-Santosh Deshmukh
| Updated on: Mar 04, 2025 | 12:58 PM
Share

“संतोष भय्याला सुद्धा आनंद वाटला पाहिजे. जबाबदारी आपली आहे. टोकाच बोलतोय मी. आपल्या हातात तेवढी एकच गोष्ट आहे, संतोष भय्याच्या मृत्यूचा बदला घेणं. त्यांना सुटून येऊ द्या जसं यायच तसं. भयंकर कृत्य आहे. इतका राग येण्यासाठी सारखी चूक नाही. तुम्हाला एवढी चीड यावी एवढं काही झालं नव्हतं. वाद, भांडण तंटा हे चालू असतं पण तिरस्कार, क्रूर हत्या करण्याएवढं काही झालेलं नाही. यांना पैसा, पद एवढच लागतं, कोणत्याही टोकाला जातील” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर, निदर्यतेने हत्या करण्यात आली. ते फोटो आता व्हायरल झालेत. हे फोटो समोर आल्यानंतर मनोज जरांगे आज धनंजय देशमुख यांना भेटायला आले. त्यावेळी देशमुख यांच्या भावनांचा बांध फुटला.

धनंजय देशमुख घरात जायची हिम्मत नाही म्हणतायत, त्यावर मनोज जरांगे म्हणाले की, “त्यांना जावं लागेल. मी सुद्धा कठोर काळजाचा आहे. एवढी घटना, फोटो बघितल्यावर कोणी पण खचून जाईल. त्यांना घरात जावं लागेल. बाहेर यावं लागेल. लढावं लागेल, बीमोड करायचा आहे” “सुटून बाहेर येऊ द्या. आता राहिले तर गोळ्या घालून फाशी होईपर्यंत लढावं लागेल. सुटून आले तर जशास तसं. आत राहिले तर फाशी होईपर्यंत लढावं लागेल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

302 लावून त्याला पण जेलमध्ये टाका

फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री अजित पवारांना भेटले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा होईल अशी चर्चा आहे. त्यावर मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं. “नुसत्या राजीनाम्याने होणार नाही. धनंज मुंडेवर 302 लावून त्याला पण जेलमध्ये टाका. नाटकबाजी करायला नको. जनता काही करु शकते” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तुमच्या एका डोळ्यात पाणी आणि दुसऱ्या डोळ्यात आग दिसते. त्यावर “आपण पहिल्यापासून असाच आहे. अन्यायाचा बीमाोड करतो. पठ्ठाया कोणाला सोडीत नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Follow Us
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड