मोठी बातमी! खासदार फुटल्यानंतर आता ठाकरे गटावर आणखी एक मोठा आघात, मविआकडून उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का?

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. 6 खासदारांनी पक्षाची साथ सोडत बंडखोरी केली आहे. हे खासदार आता लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. दरम्यान हे सर्व घडत असतानाच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

मोठी बातमी! खासदार फुटल्यानंतर आता  ठाकरे गटावर आणखी एक मोठा आघात, मविआकडून उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का?
महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का?
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 18, 2026 | 6:19 PM

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे. 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी खासदारांची बैठक बोलावली होती, तेव्हापासूनच राज्यात ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी केल्याचं पहायला मिळत आहे. या खासदारांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून सर्व खासदारांना व्हीप बजावण्यात आला होता, तसेच त्यांना गुरुवारी आयोजित बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी केवळ 3 खासदारच उपस्थित होते. यामुळे आता 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचं स्पष्ट झालं आहे.

दरम्यान हे सर्व खासदार आता लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. लवकरच या खासदारांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान या खासदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रात वातावरण चांगलंच तापलं आहे. या खासदारांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आली असून, सुरक्षेच्या कारणास्तव या खासदारांना दिल्लीहून राजस्थानमध्ये हलवण्यात आलं आहे.

उद्धव ठाकरेंसाठी हा एक मोठा धक्का आहे, मात्र हा धक्का ताजा असतानाच आता उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तो म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खासदार फुटीनंतर आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद कमी झाली आहे.  महाविकास आघाडीमध्ये आता शिवसेना ठाकरे गट नाही तर काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत असणार आहे.  आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत जागा वाटपाच्या चर्चेत काँग्रेसच मोठा भाऊ राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.  महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या तर काँग्रेस सर्वाधिक जागा मागण्याच्या तयारीत आहेत,  जागा वाटपात काँग्रेस आता कोणतीही तडजोड करणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता पुढील काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला कमी जागा येण्याची शक्यात आहे. यावर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us