AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदर्भात 15 तासांनंतरही गारांचा खच, 50 किलोची गार, आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज

unseasonal rain in maharashtra | गारांचा पाऊस इतक्या प्रचंड प्रमाणात होता की 15 तासानंतर ही गारांचा खच अद्याप शेत शिवारात कायम आहे. गारा अद्याप विरघळली नाहीय. गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपास 40 ते 50 किलीची एकच गार तयार झालीय.

विदर्भात 15 तासांनंतरही गारांचा खच, 50 किलोची गार, आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज
| Updated on: Feb 28, 2024 | 8:24 AM
Share

गणेश सोळंकी, बुलढाणा | दि. 28 फेब्रुवारी 2024 : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात असलेल्या आळंद येथे गारपीट आणि अवकाळी पाऊस झालाय. निबांच्या आकाराच्या गारी पडल्या. त्यामुळे शेड नेटसह इतर पिकांचे सुद्धा नुकसान झालेय. गारांचा पाऊस इतक्या प्रचंड प्रमाणात होता की 15 तासानंतर ही गारांचा खच अद्याप शेत शिवारात कायम आहे. गारा अद्याप विरघळली नाहीय. गारांचा खच एकत्र झाल्याने जवळपास 40 ते 50 किलोची एकच गार तयार झालीय. ही गार पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केलीय. दरम्यान आता पुन्हा विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.

विदर्भामधील चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

विदर्भामधील चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट पुणे वेधशाळेने दिला आहे. बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांत अवकाळी पाऊस होणार आहे. या ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तसेच यवतमाळ, वर्धा, भंडारा, वाशीम या जिल्ह्यांमध्ये काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. दुसरीकडे मराठवड्यातील बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी जिल्ह्यांमध्ये आज हलक्या स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरात ढगाळ वातावरण राहणार आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यात प्रचंड गारठा होता, तो आता कमी झाला असून किमान तापमान आता १८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा

अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. एकूण 823 गावातील 44 हजार 579 हेक्टरवर शेती पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान बुलढाणा जिल्ह्यात 21 हजार 768 हेक्टर क्षेत्रावर झाले आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाची नुकसानीची प्राथमिक आकडेवारीनंतर ही माहिती समोर आली. यामुळे हातातोंडाशी आलेले हरभरा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. हरभरा, गहू, कापूस, भाजीपाला व संत्रा पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे.

दरम्यान विदर्भात झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे सुरु झाले आहेत. आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळण्याची अपेक्षा आहे.

आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.