Agricultural scam|कृषी अधिकाऱ्यांचे निलंबन अटळ; घोटाळा हिमनगाचे टोक, तपासाचे मोठे आव्हान, कारण…

नाशिक कृषी घोटाळ्यात एकूण 16 कृषी अधिकारी अडकले असून, त्यातले 3 सेवानिवृत्त झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाल्याचे समजते. यातल्या काही कर्मचाऱ्यांची जिल्ह्याबाहेर इतर ठिकाणी बदली झालीय.

Agricultural scam|कृषी अधिकाऱ्यांचे निलंबन अटळ; घोटाळा हिमनगाचे टोक, तपासाचे मोठे आव्हान, कारण...
CRIME
Follow us
| Updated on: Jan 12, 2022 | 9:34 AM

नाशिकः नाशिकमधील 51 कोटी रुपयांच्या कृषी घोटाळा (Agricultural scam) प्रकरणातील कृषी अधिकाऱ्यांवर (Agriculture officers) निलंबनाची टांगती तलवार आहे. त्यांचे कधीही निलंबन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबतच शासनालाही कोट्यवधींचा गंडा घातल्याचे समजते. हे हिमनगाचे टोक असून, यातून अनेक बडे मासे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मालेगावमधील अतिवृष्टी अनुदान वाटपानंतर हा दुसरा घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामुळे प्रशासनाचेही धाबे दणाणले आहे. नाशिक जिल्ह्यातल्या 147 शेतकऱ्यांना 16 कृषी अधिकाऱ्यांनी 50 कोटी 72 लाख 72 हजार 64 रुपयांचा गंडा घातला आहे. पेठ तालुक्यातील हेदपाड-एकदरे गावाचे शेतकरी योगेंद्र उर्फ योगेश सुरेश सापटे यांनी शासनाच्या विविध योजनांना मंजुरी मिळाल्याचे पाहिले. त्यानुसार ही कामे मिळावीत म्हणून 2011 मध्ये अर्ज केला. त्यासाठी सापटे यांच्याकडून निविदा भरून घेतली. 100 रुपयांच्या कोऱ्या स्टँपपेपरवर तिकीट लालेल्या कोऱ्या 50 पावत्या तसे कोऱ्या चेकवर सह्या घेण्यात आल्या. सापटे यांना शेतीची कामे दिली. मात्र, त्यांच्या खात्यावरून 2011-2017 या काळात परस्पर 3 कोटी 17 लाख 4 हजार 504 रुपये काढून घेतले. अशाच प्रकारे इतर 147 शेतकऱ्यांना गंडवण्यात आले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी शासनाचेही कोट्यवधी रुपये लाटल्याचे समजते. मात्र, हा आकडा येणाऱ्या काळात तपासातच उघड होईल.

न्यालयाने लावली चौकशी

पेठ तालुक्यातील हेदपाड-एकदरे गावचे फसवणूक झालेले शेतकरी सापटे यांनी याप्रकरणी पेठ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात दाद मागितली. त्यांना पुरावे सादर केले. तेव्हा न्यायालयाने हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत पोलिसांना तपास करण्याचे आदेश दिले. त्यानंतर 2019 मध्ये लोकशाही दिनात तक्रार निकाली काढल्याचा दावा कृषी विभागाने केला. मात्र, सापटे यांनी आपण तक्रार केली, पण कोरोना असल्यामुळे आपल्याला कार्यालयातच येऊ दिले नाही. सहा महिन्यानंतर गेल्यावर मला अर्ज निकाली काढल्याचे कळाले. यासंदर्भात मी विभागाकडे लेखी मागितले. मात्र, विभागाने काहीही दिले नसल्याचे म्हटले आहे.

निलंबन कसे होणार?

कृषी विभागाच्या या घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी तीन कृषी अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. नियमानुसार शासकीय कर्मचारी 24 तासांपेक्षा जास्त काळ अटकेत राहिला, तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होते. त्यामुळे या कृषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे कधीही आदेश निघू शकतात. या प्रकरणात एकूण 16 कृषी अधिकारी अडकले असून, त्यातले 3 सेवानिवृत्त झाले आहेत, तर एकाचा मृत्यू झाल्याचे समजते. यातल्या काही कर्मचाऱ्यांची जिल्ह्याबाहेर इतर ठिकाणी बदली झालीय, तर एका अधिकाऱ्याच्या निवृत्तीस एक वर्षाचा काळ शिल्लकय. एकंद पोलिसांना या प्रकरणी तपास करण्यासाठी मोठ्या दिव्याला सामोरे लावे लागणाराय.

या कृषी अधिकाऱ्यांवर गुन्हे

– कृषी अधिकारी शीलानाथ पवार (रा. मानूर, ता. कळवरण) – सरदारसिंग राजपूत (रा. चाळीसगाव, जि. जळगाव) – एम. बी. महाजन (रा. ता. पेठ) – अशोक घरटे (रा. सागुडे, जि. धुळे) – विश्वनाथ पाटील (रा. परधाडे, जि. जळगाव)

या कृषी सहायकांवर गुन्हे

– राधा सहारे (रा. कुकडणे, ता. सुरगाणा) – प्रतिभा माघाडे (रा. दिंडोरी)

या कृषी पर्यवेक्षकांवर गुन्हे

– किरण कडलग (रा. जवळे कडला, ता. संगमनेर) – मुकुंद चौधरी (रा. उंबरी, ता. राहुरी) – दिलीप वाघचौरे (रा. सोलापूर)

या संशयितांवर गुन्हे

– दिलीप फुलपगार – दीपक कुसळकर – विठ्ठल रंधे – संजय पाटील – नरेश पवार – दगडू पाटील

इतर बातम्याः

Devyani Farande| 2 टर्म आमदारकी, महापालिकेतही छाप; परखड नेतृत्व देवयानी फरांदेंच्या वाटचालीवर वाढदिवसानिमित्त नजर …

Nashik Corona|नाशिकमध्ये आदिवासी महिलांचे लसीकरण कौतुकास्पद, राज्यभर अंमलबजावणी व्हावी, उपसभापतींची थाप…!

Nashik Oxygen|राज्यातला सर्वात मोठा ऑक्सिजन प्लांट नाशिकमध्ये; उत्तर महाराष्ट्राचीही चिंता मिटली

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.