कृषीमंत्री दादा भुसे यांनी कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचा सल्ला

सध्या त्यांची प्रकृती ठीक असून लवकरच ते बरे होऊन कामावर रुजू होतील असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

कृषीमंत्री दादा भुसे यांनी कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचा सल्ला
agricultural minister dada bhuse

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्वीट करत त्यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. मला कोरोनाची लागण झाली असून संपर्कात आलेल्या सगळ्यांनी काळजी घ्यावी असा सल्ला दादा भुसे यांनी दिला आहे. तर सध्या त्यांची प्रकृती ठीक असून लवकरच ते बरे होऊन कामावर रुजू होतील असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. (Agriculture Minister Dada Bhuse tested corona positive)

ट्वीटमध्ये काय म्हणाले दादा भुसे?

‘माझी कोविड- १९ चाचणी पॉझिटिव्ह आली असून, माझ्या संपर्कात आलेल्यांनी कृपया तपासणी करून घ्यावी. आपणा सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझी प्रकृती उत्तम आहे. कोरोनावर यशस्वी मात करून लवकरच मी आपल्या सेवेत रूजू होईन.’

राज्यातील दिग्गज नेत्यांना कोरोना

कोरोनाचा कहर अद्यापही सुरु आहे. कोरोनाने सर्वसामान्यांपासून लोकप्रतिनिधींपर्यंत कुणालाही सोडलं नाही. आतापर्यंत राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सर्वात आधी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर राज्यातील अनेक आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. राज्याचे उपुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. या तीनही नेत्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली. दरम्यान, देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांनीदेखील आता कोरोनावर मात केली आहे. (Agriculture Minister Dada Bhuse tested corona positive)

संबंधित बातम्या –

घाबरु नका! 43 पैकी एकही रुग्ण नव्या कोरोनाने बाधित नाही, राजेश टोपेंचा मोठा दिलासा

कोरोनाची लस घेतल्यावर तब्येत बिघडली तर, जबाबदारी सरकार घेणार की कंपनी?

कोरोनावरील लस ब्रिटन आणि द. आफ्रिकेत आढळलेल्या नव्या स्ट्रेनवरही प्रभावी : आरोग्य मंत्रालय

(Agriculture Minister Dada Bhuse tested corona positive)