घाबरु नका! 43 पैकी एकही रुग्ण नव्या कोरोनाने बाधित नाही, राजेश टोपेंचा मोठा दिलासा

43 नमुन्यात एकही दुसऱ्या स्ट्रेनचा पॉझिटिव्ह रुग्ण नाही असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.

घाबरु नका! 43 पैकी एकही रुग्ण नव्या कोरोनाने बाधित नाही, राजेश टोपेंचा मोठा दिलासा

औरंगाबाद : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा अवतार (new corona) समोर आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. पण यासंबंधी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. महाराष्ट्रात (maharashtra) UK च्या दुसऱ्या स्ट्रेनचा एकही रुग्ण नसल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. 43 नमुन्यात एकही दुसऱ्या स्ट्रेनचा पॉझिटिव्ह रुग्ण नाही असं आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. (None of the 43 patients were affected by the new corona in maharashtra said Rajesh Tope)

राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कुठेही नवा कोरोनाचा अवतार आढळला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही. पण तरीही आवश्यक ती काळजी घेणं महत्त्वाचं असून रुग्णाचे स्वॅब पाठवण्यास हलगर्जीपणा झाला असेल तर तुम्ही जाब विचारू शकता असंही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

आंतराष्ट्रीय फ्लाईट्स थांबवणारं महाराष्ट्र पहिलं राज्य

नव्या कोरोनाचा उद्रेक होत असल्याचं समोर येताच राज्यात येणाऱ्या आंतराष्ट्रीय फ्लाईट्स थांबवण्यात आल्या. UK मधील फ्लाईट थांबवणारं महाराष्ट्र हे पाहिले राज्य आहे. इतकंच नाही तर सगळ्या प्रवाश्यांना इन्स्टिटय़ूशनल क्वारंटाईनही केलं जात आहे. देश आणि राज्यात योग्य ती काळजी घेतली जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन राजेश टोपे यांच्याकडून करण्यात आलं आहे.

यावेळी आरोग्यमंत्री म्हणाले की, नव्या कोरोनाच्या संसर्गाचा वेग 70 % जास्त आहे. त्यामुळे संसर्ग अधिक गतीने होऊ शकतो. यामुळे अमेरिका आणि युरोप खंडातील लोक कठोर लॉकडाऊन करत आहेत असं होऊ नये यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या नव्या कोरोनाचा धोका नसला तरी भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना राजेश टोपे यांनी नागरिकांना अवयव दान करण्याचंही आवाहन केलं आहे. कोव्हिड असलेले लोक आणि कोरोनामुक्त झालेले लोक अवयव दान करू शकतात. त्यामुळे अशा लोकांनी स्वत: पुढे येऊन अवयव दान करावे असंही राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. (None of the 43 patients were affected by the new corona in maharashtra said Rajesh Tope)

संबंधित बातम्या –

कोरोनाची लस घेतल्यावर तब्येत बिघडली तर, जबाबदारी सरकार घेणार की कंपनी?

कोरोनावरील लस ब्रिटन आणि द. आफ्रिकेत आढळलेल्या नव्या स्ट्रेनवरही प्रभावी : आरोग्य मंत्रालय

(None of the 43 patients were affected by the new corona in maharashtra said Rajesh Tope)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI