AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा घसरले; आता शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांसंदर्भात बोलताना वादग्रस्त वक्त्यव्य केलं आहे. यावरून आता वातावरण तापण्याची शक्यता आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा घसरले; आता शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
| Updated on: Apr 10, 2025 | 6:13 PM
Share

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या चांगलेच चर्चेमध्ये आहेत. शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला, फळबाग आणि शेतातील इतर पिकांचं  पावसामुळे मोठं नुकसान झालं, पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी पाहाणी दौऱ्यावर असातना नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. कर्जमाफी कधी होणार? असा प्रश्न विचारनाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी चांगलंच सुनावलं होतं.

तुम्ही दोन -चारा वर्ष कर्जमाफीची वाट पाहाता, कर्जमाफीच्या आलेल्या पैशांमधून लग्न आणि साखरपुडा करता असं माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना म्हटलं होतं. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून राज्यात चांगलंच वातावरण तापलं, विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांच्या कोंडीचा प्रयत्न झाला. मात्र त्यानंतर आपल्या या वक्तव्याबद्दल माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

परंतु आता पुन्हा एकदा माणिकराव कोकाटे यांनी कांद्याच्या दरावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कांद्याचे बाजारभाव पडायला शेतकरीच जबाबदार असल्याचं म्हणत त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुनावलं आहे. ‘एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात’  असं कोकाटे यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले कोकाटे?  

“ एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात, कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे, दुप्पट तिप्पट ठीक पण पन्नास पटीने कांद्याची लागवड करायला लागले, तर कांद्याचे बाजारभाव पडणारच, अशा शब्दात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी कांद्याच्या बाजारभावावरुन शेतकऱ्यांना सुनावलं आहे. कांद्याचा बाजरभाव पाडण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांनाच जबाबदार धरलं आहे.  दरम्यान कोकाटे यांच्या या वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे.

अवकाळीचा शेतकऱ्यांना मोठा फटका 

राज्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. अवकाळीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक भागांमध्ये फळ बागा आणि इतर पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. कृषीमंत्र्यांकडून नुकसानीचा आढावा घेण्यासाठी पाहाणी दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहाणी सुरू आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?