BMC Election 2026: महानगरपालिका निवडणूकीत ‘पाडू’! 140 ठिकाणी नवे यंत्र, काय आहे प्रकार?
BMC Election 2026: महानगरपालिका निवडणुकांसाठी अवघे काही तास शिल्लक असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने ईव्हीएम मशीनसोबत अचानक एक नवीन मशीन आणली आहे. त्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. हे नवे मशीन पाडू 140 बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली निवडणुकीची रणधुमाळी काल अखेर थांबली आहे. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्ष मतदानाच्या तयारी लागलेले आहेत. उद्या, 15 जानेवारी रोजी राज्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र, मतदानाच्या एक दिवस आधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आयोगाने ईव्हीएम मशीनसोबत अचानक एक नवीन मशीन आणली आहे. त्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे. आता हे नवे मशीन ‘पाडू‘ (PADU) नेमकं काय काम करणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जाणून घ्या सविस्तर…
कधी केला जाणार वापर?
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राचा वापर मतमोजणीसाठी केला जातो. मात्र, या मशीनच्या माध्यमातून मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit) या यंत्राचा वापर होणार आहे. पाडू या तंत्रद्वारे निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मकरीत्या त्याचा वापर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
‘पाडू‘बाबत राज्य आयोगाचे आदेश काय?
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची मतदान यंत्रे केवळ बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच वापरली जात आहेत. ही यंत्रे भारत निवडणूक आयोगाची असून ती ‘एम3ए’ या प्रकाराची आहेत. त्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी कंट्रोल युनिटला (सीयू) बॅलेट युनिट (बीयू) जोडून करावी. फक्त तांत्रिक अडचण आली तरच अत्यंत अपवादात्मकरीत्या पाडूचा वापर करावा, असे राज्य निवडणूक आयोगाचे आदेश आहेत.
140 ठिकाणी वापरले जाणार ‘पाडू’
बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी 140 ‘पाडूं’ची उपलब्धता करून देण्यात आली आहे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत मतमोजणीसाठी ‘पाडू’ची गरज भासल्यास बेल कंपन्याच्या तंत्रज्ञांच्या उपस्थितीत त्याचा वापर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ‘पाडू’च्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखविले आहे.