AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : भांडे ठेवताच गाय देते 4 ते 5 लिटर दूध, घटनेची परिसरात चर्चा…

भांडे गाईच्या सडा खाली ठेवताच आपोआप 4 ते 5 लिटर दूध निघत आहे. सध्या सदर गाईचा दूध निघतानाचा व्हीडीओ सोशल मीडियावर वायरल होताच परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

Video : भांडे ठेवताच गाय देते 4 ते 5 लिटर दूध, घटनेची परिसरात चर्चा...
| Edited By: | Updated on: May 11, 2022 | 4:42 PM
Share

शिर्डी, अहमदनगर : गायीने भरपूर दूध द्यावं. त्यातून भरपूर उत्पादन मिळावं यासाठी शेतकरी प्रयत्न करत असतो. यातले कष्ट कमी व्हावेत अशी इच्छा असते. पण या सगळ्यात काही भलतेच प्रकार समोर येतात. असाच एक आश्चर्याचा धक्का देणारा प्रकार समोर आला आहे. गाय (Cow) भांडे ठेवताच दुध द्यायला सुरूवात करत असल्याचं समोर आलं आहे. गाईच्या सडांमधुन आपोआप दुध येत असल्याने मगन भारूड (Magan Bharud)  या शेतकऱ्याची गाय चर्चेचा विषय बनली आहे. गेल्या 20 दिवसांपासुन असा प्रकार होत असल्याचं शेतकरी मगण भारूड यांनी सांगितलंय.

आपण आजवर अनेक गाई पाहिल्या असेल आणि गाईचे दूध हाताने किंवा मशीनच्या साहाय्याने काढताना पाहिलं असेल, माञ कोपरगाव तालुक्यात न पिळताच दूध देणारी गाय चर्चेचा विषय बनलीय. कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावात राहणारे शेतकरी मगण किसन भारुड यांनी 6 महिन्यांपूर्वी एक जर्सी गाय खरेदी केली आणि महिना भरापूर्वी ही गाय जनली असून तिला कालवड झाली. मात्र गाईचे दूध काढताना भारुड यांना गाईच्या सडाला हात लावण्याची गरजच पडत नाही.

भांडे गाईच्या सडा खाली ठेवताच आपोआप 4 ते 5 लिटर दूध निघत आहे. सध्या सदर गाईचा दूध निघतानाचा व्हीडीओ सोशल मीडियावर वायरल होताच परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे. गेल्या 20 दिवसांपासून सदर गाय सकाळ संध्याकाळ दररोज 4 ते 5 लिटर दूध एका वेळेस देत आहे. सुरुवातीला अपोआप दूध निघताना पाहिल्यानंतर भारुड कुटुंबाला देखील आश्चर्य वाटले.

गाय जनल्यानंतर लुझ मिल्कर असल्याने असे प्रकार होऊ शकतात त्यामुळे हा चमत्कार वगैरेचा काही भाग नसून आश्चर्य व्यक्त करण्यासारखा किंवा घाबरून जाण्यासारखा प्रकार नसल्याच पशुवैद्यकीय अधिका-यांनी स्पष्ट केलंय.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.