AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmedabad Plane Crash : विमान कोसळलं, त्याच इमारतीत झोपली होती, अकोल्याच्या तरुणीचा कसा वाचला जीव? थरारक कहाणी समोर

अहमदाबादमधील भीषण विमान अपघातात अकोल्याची विद्यार्थिनी ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली. मेडिकल कॉलेज हॉस्टेलमध्ये झोपलेली असताना विमानाचा आवाज ऐकून ती जागी झाली आणि धुरातून सुरक्षित बाहेर पडली.

Ahmedabad Plane Crash : विमान कोसळलं, त्याच इमारतीत झोपली होती, अकोल्याच्या तरुणीचा कसा वाचला जीव? थरारक कहाणी समोर
aishwarya toshniwal 1
| Updated on: Jun 13, 2025 | 1:55 PM
Share

अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान अपघातामुळे संपूर्ण भारताला हादरा बसला. या विमान अपघातात अकोल्याची विद्यार्थिनी ऐश्वर्या तोष्णीवाल थोडक्यात बचावली आहे. ती ज्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होती, त्याच परिसरात हे विमान कोसळले. मात्र प्रसंगावधान राखत तिने स्वतःचा जीव वाचवला.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये गुरुवारी (१२ जून २०२५) भीषण विमान अपघात झाला. या विमान अपघातामुळे एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एअर इंडियाचं विमान (एआय १७१) कोसळलं. ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र, या अपघातात अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल ही तरुणी थोडक्यात बचावली आहे. या अपघाताच्या वेळी ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथील हॉस्टेलच्या दुसऱ्या इमारतीत आणि पाचव्या मजल्यावर झोपलेली होती. ती डीएम ऑन्कोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे.

मोठा आवाज, सर्वत्र धूर

अपघाताच्या काही दिवसांपूर्वीच ती आपल्या आजोबांचा वाढदिवस साजरा करून अकोल्याहून अहमदाबादला परतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्या ही झोपलेली असताना अचानक मोठा आवाज झाला. या मोठ्या आवाजाने ऐश्वर्या झोपेतून जागी झाली. तिने डोळे उघडताच सर्वत्र धुराचे लोट पसरलेले दिसले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच ऐश्वर्याने जराही वेळ न घालवता स्वतःला एका ब्लँकेटमध्ये लपेटले.

प्रसंगावधानामुळे मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर

यानंतर ती धुराच्या गर्दीतून आणि अंधारातून वाट काढत पाचव्या मजल्यावरून खाली उतरली. तिने कसाबसा आपला जीव वाचवला. या प्रयत्नात तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर भाजल्याच्या खुणा झाल्या आहेत. या घाबरलेल्या अवस्थेतही ऐश्वर्याने लगेच आपले वडील अमोल तोष्णीवाल यांना फोन करून माहिती दिली. ऐश्वर्याच्या आई-वडिलांनी या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही घटना ऐश्वर्यासाठी एका भयानक स्वप्नासारखी असली तरी तिच्या प्रसंगावधानामुळे ती मोठ्या संकटातून सुखरूप बाहेर पडली आहे.

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.