AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप Vs राष्ट्रवादी काँग्रेस, कर्जत-जामखेड बाजार समिती निवडणुकीचा रणसंग्राम, रोहित पवार विरुद्ध राम शिंदे , कुणाचं पारडं जड?

सत्तांतरानंतर प्रथमच बाजार समित्यांच्या निवडणुकीने राज्यभऱातील राजकीय वातावरण तापलं आहे. अहमदनगर येथील कर्जत जामखेड बाजार समितीतील भाजप विरुद्ध राष्ट्रवादीच्या लढतीकडे जनतेचं विशेष लक्ष आहे.

भाजप Vs राष्ट्रवादी काँग्रेस, कर्जत-जामखेड बाजार समिती निवडणुकीचा रणसंग्राम, रोहित पवार विरुद्ध राम शिंदे , कुणाचं पारडं जड?
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 06, 2023 | 10:59 AM
Share

कुणाल जायकर, अहमदनगर : राज्यात सध्या बाजार समितीच्या निवडणुकीची (APMC Election) रणधुमाळी सुरू आहे. अहमदनगरला कर्जत-जामखेड येथे दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. ही निवडणूक आम्ही जिंकणार असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे वातावरण चांगलं तापू लागलंय. विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच बाजार समितीची निवडणूक होत आहे. त्यामुळे बाजार समिती आपल्या ताब्यात येण्यासाठी आमदार रोहित पवारांसह आमदार राम शिंदे यांनी देखील बैठकांवर भर देत चांगलीच कंबर कसली आहे. तसेच जामखेड येथील राष्ट्रवादीचे भास्करराव मोरे हे आपला स्वतंत्र पॅनल लढवणार असल्याने आमदार रोहित पवारांना मोठे अहवान असणार आहे. तर पहिल्यांदा शेतकरी निवडणूक लढत असल्याने बाजार समिती खेचून आणण्यात कोणाला यश मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस

बाजार समितीच्या निवडणुकीत आमचा पॅनल शंभर टक्के निवडून येईल असा विश्वास राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलाय. कर्जत आणि जामखेड या दोन्ही तालुक्यांमध्ये ज्या बाजार समिती आहे त्यांना ताकद देण्याची गरज होती, मात्र ती दिली गेली नाही असा टोला आमदार राम शिंदे यांचे नाव न घेता लगावला आहे. तर मोठ्या प्रमाणात उलाढाल होऊ शकते एवढी ताकद या बाजार समितीमध्ये आहे. मात्र जे व्हिजन आणि दूरदृष्टी लागते ते कोणी दिलेलं नाही अस रोहित पवारांनी म्हटलंय. तर आमचा पॅनल शंभर टक्के निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

इतिहासात पहिल्यांदाच शेकडो अर्ज

बाजार समितीच्या निवडणुकीवरून भाजपचे आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांवर निशाणा साधलाय. रोहित पवार यांच्याकडे कोणीही उमेदवारी मागायला गेला नाही असा टोला राम शिंदे यांनी लगावलाय. सर्वसामान्य शेतकरी या बाजार समितीच्या निवडणुकीत उभा राहिला पाहिजे असा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. तर कर्जत जामखेडच्या इतिहासात पहिल्यांदाच इतके अर्ज शेतकऱ्यांनी भरल्याचंही राम शिंदे यांनी सांगितलं.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर नगरपंचायतची एकच निवडणूक झाली, मात्र त्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेऊन आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवले गेले, असा आरोप राम शिंदे यांनी केला. तर आमचे विरोधी आमदारांकडे कोणीही उमेदवारी मागितली नाही, उमेदवारी मागितली की मिळेल की नाही याचा लोकांना किंचितही विश्वास नव्हता. त्यामुळे शेकडोंनी अर्ज बाजार समितीच्या निवडणुकीत आले आहेत, असा टोला त्यांनी राम शिंदे यांनी लगावलाय.

भास्करराव मोरेंचं आव्हान

जामखेड येथील राष्ट्रवादीचे नेते भास्करराव मोरे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल करून लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर मोठा आव्हान असणार आहे. तर आमदार रोहित पवार यांच्यावर त्यांनी नाव न घेता टीका केली आहे.. स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी लढण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय. जे शेतकरी केंद्रबिंदू मानायला पाहिजे, त्या शेतकऱ्यांकडे लक्ष न देता संचालकांनी आणि नेतृत्वाने मार्केट कमिटी ताब्यात ठेवण्यासाठी निवडणूक लढत असतील तर ते दुर्दैव असल्याचं त्यांनी म्हटलय. प्रत्येकाला स्वाभिमान असतो.

प्रत्येक कार्यकर्त्याला दुसरी कशाची अपेक्षा नसते. मान सन्मान त्याचा अभिमान जिवंत राहिला पाहिजे, ही भूमिका असते असा टोला मोरे यांनी लगावलाय. अशा कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळवून देण्याचा काम मला या निवडणुकीत करायचा आहे,त्यामुळेच मी लढण्याचा निर्णय घेतल्याचं मोरे यांनी सांगितलं. एकूणच,  कर्जत जामखेडच्या बाजार समिती निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?