AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मध्यरात्री चोरीचा थरार, किचनमधून घरात शिरला, आणि साडे नऊ लाखांचे दागिने लंपास, पोलिसांनी 24 तासात चोराच्या मुसक्या आवळल्या

कोपरगाव शहरातील गजानन नगर भागात दोन दिवसांपूर्वी घरफोडी करुन 9 लाख 65 हजार किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला कोपरगाव शहर पोलिसांनी 24 तासांच्या आत संपूर्ण मुद्देमालासह जेरबंद केलंय.

मध्यरात्री चोरीचा थरार, किचनमधून घरात शिरला, आणि साडे नऊ लाखांचे दागिने लंपास, पोलिसांनी 24 तासात चोराच्या मुसक्या आवळल्या
मध्यरात्री चोरीचा थरार, किचनमधून घरात शिरला, आणि साडे नऊ लाखांचे दागिने लंपास
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 29, 2024 | 5:58 PM
Share

अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात 25 जुलैला चोरीची घटना घडली होती. चोरटा घराच्या पाठीमागे असणाऱ्या किचन रुमच्या दरवाजाची कडी आणि कोयंडा तोडून आतमध्ये शिरला होता. त्याने घरातील तब्बल 9 लाख 65 हजार किंमतीचे दागिने चोरले होते. या चोराच्या मुसक्या आवळण्यात कोपरगाव शहर पोलिसांना मोठं यश आलं आहे. विशेष म्हणजे कोपरगाव शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासांच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यामुळे नागरिकांकडून पोलिसांच्या कारवाईवर कौतुक केलं जात आहे.

संबंधित घटना ही कोपरगाव शहरातील गजानन नगर भागात कोर्ट रोड परिसरात घडली होती. कोपरगावच्या कोर्ट रोड येथे मालती रुपेश हाडा या वास्तव्यास आहेत. यांच्याच घरात ही जबरी चोरीची घटना घडली होती. अज्ञात आरोपी हा 25 जुलैच्या मध्यरात्री घराच्या पाठीमागून किचन रुममधून घरात शिरला होता. आरोपीने किचन रुमच्या दरवाजाची कडी आणि कोयंडा तोडत आतमध्ये प्रवेश केला होता. त्याने किचन रुममध्ये नासधूस केली होती.

पोलिसांनी आरोपीला कसं शोधलं?

आरोपी चोराने किचन ओट्याखाली असलेल्या लोखंडी पेटीतील साडे नऊ लाख रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेले होते. संबंधित चोरीची घटना लक्षात आल्यानंतर घरमालकीण मालती रुपेश हाडा यांनी पोलिसांत धाव घेतली होती. मालती हाडा यांनी पोलिसात तक्रार केली होती. यानंतर याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सर्व घटनाक्रम समजून घेत तपासाला सुरुवात केली. तसेच पोलिसांनी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? याचादेखील शोध घेतला. पोलिसांकडून तपास सुरु असतानाच त्यांना गोपनीय माहीतीच्या आधारे त्यांना एका इसमावर संशय आला. पोलिसांनी तातडीने त्या इसमाला ताब्यात घेतलं. या इसमाचं नाव शुभम केशव राखपसरे असं आहे. तो इसमदेखील गजानन नगर परिसरातच राहतो. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. सुरुवातीला आरोपीने आपला गुन्हा कबूल करण्यास विरोध केला. पण पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीने दडवलेला मुद्देमाल हस्तगत केला.

Follow Us
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?