प्रकाश आंबेडकर महायुतीत आले तर त्यांना…; बड्या नेत्याकडून ‘वंचित’ला आमंत्रण

Ramdas Athwale on Prakash Ambedkar : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी राज्यात सुरु झाली आहे. काहीच वेळात निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्याआधी प्रकाश आंबेडकर यांना महायुतीत येण्यासाठी आमंत्रित केलं गेलं आहे. आंबेडकरांना कुणी दिलं हे आमंत्रण? वाचा सविस्तर...

प्रकाश आंबेडकर महायुतीत आले तर त्यांना...; बड्या नेत्याकडून 'वंचित'ला आमंत्रण
प्रकाश आंबेडकर, नेते वंचित
Follow us
| Updated on: Oct 15, 2024 | 2:56 PM

अवघ्या काही मिनिटात महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. अशातच आता राजकीय घडमोडींना वेग आला आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीत यावं, अशी इच्छा केंद्रीय मंत्री रामदार आठवले यांनी व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर हे ज्येष्ठ आणि स्ट्राँग नेते आहेत. समाजाला सत्तेत आणण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांच्या पक्षाला अद्याप राज्यात मान्यता नाही. प्रकाश आंबेडकर यांनी सकारात्मक विचार करावा. आम्ही एकत्र आलो तर समाजात उत्साह वाढेल. प्रकाश आंबेडकर महायुती सोबत आले तर सत्तेत वाटा मिळेल. त्यांनी महायुतीसोबत यावं. वैचारिक मतभेद असले तरी राजकीय आघाड्या होतात. त्यांचा वंचितचा प्रयोग चांगला आहे. मात्र लोक त्यांच्या सोबत येत नाहीत. त्यामुळे ते जर महायुतीसोबत आले तर फायदा होईल, असं रामदार आठवले म्हणाले आहेत.

प्रकाश आंबेडकरांना पक्षाध्यक्ष करू- आठवले

ऐक्याबद्दल त्यांच्याशी अद्याप चर्चा झाली नाही. मात्र समाज हितासाठी एकत्र यायला हवं. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात काम करण्याची माझी तयारी आहे. प्रकाश आंबेडकर यांनी रिपाइंचे अध्यक्ष व्हावं. माझा पाठिंबा त्यांना पाठिंबा आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा रिपाइं पक्ष आहे. त्यांची भूमिका स्वतंत्र लढण्याची आहे. मात्र आम्ही एकत्र आलो तर कुणासोबत जायचे याचा निर्णय घेता येईल. प्रकाश आंबेडकर यांच्याशिवाय इतर गट एकत्र आले तरी फायदा होणार नाही, असं रामदास आठवले म्हणालेत.

विधानसभा निवडणुकीबाबत काय म्हणाले?

महाराष्ट्रात दोन फेजंध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्य लढत होणार आहे. हरियाणात आम्हाला चांगले यश मिळालं आहे. तिथे काँग्रेस येईल असे रिपोर्ट होते मात्र आम्ही आलो. महाराष्ट्रात मविआ येणार असल्याचं बोललं जातंय. मात्र वातावरण बदललं आहे. महाराष्ट्रात आम्हाला यश मिळेल. राहुल गांधी यांनी विदेशात जाऊन संविधान बदल्याची भाषा केली. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीला मतदान करणार नाही. राज्यात लोकसभेला 40 जागांचा अंदाज होता, पण निकाल वेगळा लागला. राज्यात महायुतीच्या 170 जागा निवडून येतील, असा विश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

अहमदनगरमधील श्रीरामपूर विधानसभेच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. कार्यकर्त्यांनी लढण्याच्या भावना व्यक्त केल्या असतील. मात्र माझा आदेश अंतिम राहील. पण श्रीरामपूरमधून लढण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. मला एकट्याला मंत्रिपद दिले म्हणजे रिपाईला काही द्यायचे नाही ही भूमिका चुकीची आहे, असं आठवले म्हणाले.

शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता...
शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता....
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात.
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'.
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ.
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी.
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या.
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे.
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत.