AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शनिदेवावर ब्रँडेड तेलानेच अभिषेक का? नवीन नियम जाणून घ्या, नाहीतर तेल ही जाणार आणि पूजा पण नाही होणार

Shanishinganapur Shani Temple : शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या शिळेवर आजपासून ब्रँडेड तेलाचाच अभिषेक स्वीकारला जाणार आहे. शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीच्या निर्णयाला कसा प्रतिसाद मिळतो हे दुपारपर्यंत समजणार आहे.

शनिदेवावर ब्रँडेड तेलानेच अभिषेक का? नवीन नियम जाणून घ्या, नाहीतर तेल ही जाणार आणि पूजा पण नाही होणार
शनी शिंगणापूरImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 01, 2025 | 10:03 AM
Share

अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या दर्शनासाठी लाखो भाविक देशभरातूनच नाही तर परदेशातून येतात. शनिदेवावर अनेक जण तेलाचा अभिषेक करतात. येथे पूजा अर्चा करतात. त्यातच मंदिर ट्रस्टने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून 1 मार्चपासून सुरू झाली आहे. शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या शिळेवर आजपासून ब्रँडेड तेलाचाच अभिषेक स्वीकारला जाणार आहे. शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीच्या निर्णयाला कसा प्रतिसाद मिळतो हे दुपारपर्यंत समजणार आहे.

काय घेतला निर्णय

शनिदेवाच्या शिळेवर आजपासून ब्रँडेज तेलानेच अभिषेक करता येणार आहे. याविषयीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. भविष्यात शनि देवाच्या शिळेची झीज होऊ नये म्हणून शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतने हा निर्णय घेतला आहे. हा आदेश आजपासून 1 मार्चपासून लागू झाला आहे. मंदिराच्या ट्रस्टींनी याविषयीची माहिती दिली आहे. शिंगणापूर येथे शनिदेवाच्या मूर्तीवर तेल अभिषेक करण्याची परंपरा आहे. भेसळयुक्त तेलाने अभिषेक होत असल्याने शनिदेवाची स्वयंभू मूर्ती खराब होत असल्याचे ग्रामस्थ आणि देवस्थान ट्रस्टचे म्हणणे आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

तेल खरेदीपूर्वी तपासा

देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ यांच्या बैठकीत अजून एक निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे तुम्हाला शनिदेवावर तेल अभिषेक करायचा असेल तर ते तेल तपासावे लागेल. जर भाविकांच्या तेलाबाबत ट्रस्टला संशय असेल तर तेलाभिषेक करता येणार नाही. अशा तेलाचा अभिषेक करता येणार नाही. असे तेल अगोदर भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणाकडे पाठवण्यात येईल. शनी शिंगणापूर देवस्थानने हा नियम 1 मार्चपासून लागू होणार आहे. या निर्णयाचे अनेक भाविकांनी स्वागत केले आहे.

संपूर्ण देशात शनिदेवाचे अनेक मंदिर आहेत. त्यात तीन सर्वात जुने पीठ असल्याचे मानण्यात येते. त्यांचे अत्यंत महत्त्व आहे. त्यात शनि शिंगणापूर, शनिश्वर मंदिर ग्वाल्हेर आणि सिद्ध शनिदेव मंदिर, काशीवन, उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. या नवीन नियमानंतर आता तेल विकत घेताना भाविकांना काळजी घ्यावी लागणार आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.