AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar यांना सर्व ताकद पणाला लावून ही मोठा धक्का?, एक्झिट पोलने राष्ट्रवादीच्या गोटात शांतता

अजित पवार यांना पुन्हा एकदा धक्का बसताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. पण त्याआधी एक्झिट पोलने राष्ट्रवादीच्या चिंता वाढवल्या आहेत.

Ajit Pawar यांना सर्व ताकद पणाला लावून ही मोठा धक्का?, एक्झिट पोलने राष्ट्रवादीच्या गोटात शांतता
Chinchwad by election
| Updated on: Mar 01, 2023 | 12:35 PM
Share

पुणे : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप ( Laxman Jagtap ) यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. पोटनिवडणुकीसाठी मतदान पूर्ण झालं असून उद्या म्हणजेच 2 मार्च रोजी याचा निकाल लागणार आहे. या ठिकाणी अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पण तरी देखील राष्ट्रवादीला या ठिकाणी मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. चिंचवडमधून भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप, महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल तानाजी कलाटे यांच्यात थेट लढत होती.

निकाल येण्याआधीच एक्झिट पोल समोर आले आहे. ज्यामध्ये चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी भाजप आणि राष्ट्रवादी विजयाचा दावा करत होते. पण एक्झिट पोलनुसार राष्ट्रवादीला धक्का बसताना दिसत आहे. कारण एक्झिट पोलनुसार भाजपच्या उमेदवाराचा विजय होणार असल्याची शक्यता आहे.

अजितदादांना पुन्हा धक्का

चिंचवडमधील ( Chinchwad By-Election ) पराभव हा अजित पवार यांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. निकालाआधीच भाजपच्या ( BJP ) उमेदवाराचे विजयाचे बॅनर लागले आहेत. राष्ट्रवादीने ( NCP ) या ठिकाणी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. पण तरी देखील त्यांना यश मिळताना दिसत नाहीये. एक्झिट पोलनुसार या ठिकाणी भाजपचा उमेदवार विजयी होत असला तरी निकालात चित्र स्पष्ट होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधीपक्ष नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असे दिग्गज नेते निवडणुकीत जोरदार प्रचारासाठी उतरले होते. पुणे हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. 2009 पासून या ठिकाणी लक्ष्मण जगताप हे आमदार होते. २००९ मध्ये अपक्ष तर 2014 आणि 2019 मध्ये भाजपकडून त्यांनी निवडणूक लढवून विजय मिळवला होता.

एक्झिट पोलनुसार मतांची टक्केवारी

अश्विनी लक्ष्मण जगताप – भाजप : ४५% – ४७% नाना काटे – राष्ट्रवादी : ३१% – ३३% राहुल कलाटे – अपक्ष : १८% – २०%

निकालाआधीच झळकले विजयाचे फलक

मुंबई द्रुतगती मार्गावर चिंचवड मतदारसंघाचा आमदार म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप (Ashwini Laxman Jagtap ) यांचे फलक लागले आहेत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली, पण गुरुवारी नागरिकांनी कुठल्या उमेदवाराला कौल दिला आहे हे समजणार आहे. पण त्याअगोदरच मध्यरात्री द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाका येथे अश्विनी लक्ष्मण जगताप यांची आमदारपदी निवड झाली म्हणून फलक लावण्यात आलेत. पुण्यातील फलकाचे लोण द्रुतगती मार्गावर येऊन पोहचलं आहे.

एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया

पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने अंदाज व्यक्त करणे कठीण असले तरीही महाविकास आघाडीच्या दोन्ही जागा या निवडून येतील असा विश्वास एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांनी व्यक्त केला आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.