
अजितदादा यांच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघाताभोवतीचं संशयाचे धुकं काही हटायला तयार नाहीए..कारण आता या विमानाचा ब्लॅक बॉक्सचा डेटा करप्ट झाल्याचे वृत्त आले असून परदेशातील तज्ज्ञांचे सहाय्य यासाठी घेतले जाणार असल्याचे वृत्त आहे. मात्र, या प्रकरणात संरक्षण तज्ज्ञांनी वेगळाच दावा केला आहे.त्यांनी म्हटले आहे की ब्लॅक बॉक्सचा डेटा करप्ट झाल्याचा जर दावा केला जात असेल तर नक्कीच या अपघातामागं काहीतरी काळंबेरं असण्याचे प्रथमदर्शनी वाटत असल्याचे या तज्ज्ञांनी म्हटले आहे.
या संदर्भात लेफ्टनंट कर्नल आणि संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे यांनी टीव्ही ९ मराठी चॅनलशी बोलताना महत्वाची सांगितली आहे. ते म्हणाले की उच्च तापमानामुळे ब्लॅकबॉक्स डेटा झाला असं कोणी म्हणत असेल तर प्रथम दर्शनी काहीतरी काळबेर आहे अशी शंका येते. कारण ब्लॅक बॉक्स सुरक्षित ठिकाणी असतो, त्याच्यावर काही परिणाम होणार नाही अशी व्यवस्था संबंधित विमानात केलेली असते.
तसेच आपण सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले तर काही फुटांवरून हा विमान अपघात झाला आणि त्यानंतर आग लागल्याचे दिसत आहे. ब्लॅक बॉक्स अशाप्रकारे तयार केलेला असतो, जो तब्बल 1100 डिग्री सेंटीग्रेडच्या टेंपरेचरला 60 मिनिटांसाठी लागोपाठ जरी असलं तरीसुद्धा हा ब्लॅकबॉक्स त्यामध्ये जळणार नाही अशी व्यवस्था केलेली असते असे संरक्षण तज्ज्ञ ढगे यांनी म्हटले आहे. 260 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर असेल तर आणि सतत दहा तास तो जळत असेल तर मात्र हा ब्लॅक बॉक्स सापडू शकत नाही.
पाण्यात आत सहा हजार मीटर खोलीवर हा ब्लॅक बॉक्स पडलेला असेल आणि त्यावर प्रचंड दबाव असूनही समुद्रात तो तसाच राहतो. 3 हजार 400 पट ग्रॅव्हिटीचा दबाव असेल तरी सुद्धा त्याला काही होत नाही असेही त्यांनी सांगितले. काही फुटावरून हा अपघात झाला आहे. त्यामुळे एवढा मोठा त्यावर दाब होता का ? हे डाऊट फुल आहे. त्या ठिकाणी आग लागली, मात्र 1100 डिग्री सेंटीग्रेड सातत्याने एक तासभर त्या ठिकाणी टेंपरेचर होतं का ? हे प्रश्न आहेत. ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला असं जर कोणी म्हणत असेल तर डाऊट फुल आहे असेही ढगे यांनी सांगितले.
त्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत, आपण ज्याला म्हणतो ब्रेड अँड बटर टेक्नॉलॉजी थोडक्यात डायरेक्टली त्या ब्लॅक बॉक्समधल्या मेमरीची चीप काढणे आणि त्याला डायरेक्टली रीड करण्यासाठी प्रयत्न करणे ही सुद्धा पद्धत वापरली जाऊ शकते.
किती जरी अवघड अपघाचा प्रकार असला तरी त्या ठिकाणी ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर करता येतो. जून 2025 ला एअर इंडिया विमानाचा जो अपघात झाला त्याचा ब्लॉक बॉक्स मिळाला आणि त्याची सगळी माहिती आपल्याला मिळाली आहे. 2006 मध्ये ॲमेझॉन फॉरेस्टमध्ये एक्सीडेंट झाला त्याच्यानंतर त्याचा ब्लॅक बॉक्स कित्येक दिवसानंतर अमेझॉनच्या जंगलामध्ये सापडला होता. मलेशियाचे विमान समुद्रात कोसळल्यानंतर कित्येक दिवसानंतर त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स समुद्रामधून सापडला होता असेही ढगे यांनी सांगितले. अशी खूप सारी उदाहरण आहेत, ब्लॅक बॉक्स मिळाला आणि त्याची माहिती रिट्राय केली गेली.
साल 2001 मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करण्यात आला त्याचा ब्लॅक बॉक्स मिळाला नाही, मात्र त्यावर शंका कुशंका आहेत. ब्लॅक बॉक्स जळून खाक झाला असे म्हणणं म्हणजे कुठेतरी काहीतरी चुकतंय असे म्हणता येईल असेही सतीश ढगे यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांनी या अपघाताची खाजगी गुप्तहेर संस्थेमार्फेत चौकशी करणार असल्याचे वक्तव्य केले आहे.त्या संदर्भात विचारले असता, या चौकशी संदर्भात दोन महत्त्वाच्या बाबी आहेत, यामध्ये तांत्रिकदृष्ट्या माहिती लागणार आहे, ज्यामध्ये या ब्लॅक बॉक्सच्या संबंधित जो फ्लाईट डेटा रेकॉर्डर आहे. त्याचबरोबर कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर आहे, यातला सगळा डेटा तांत्रिकदृष्ट्या मिळणे आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.
आपल्याकडे अधिकृतरित्या हा डेटा AAIB म्हणजे एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरो आहे, यांच्याकडे हा सगळा डेटा असणार आहे.किंवा ही जी कंपनी आहे त्यांच्याकडे हा सगळा डेटा असणार आहे.प्रायव्हेट एजन्सीला अशा प्रकारचा अधिकृत डेटा मिळणार आहे का ? हा प्रश्न आहेच. पण याचा दुसरा अँगल हा आहे की, मुळात जे वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय अँगल आहेत त्याचा मात्र नक्कीच प्रायव्हेट एजन्सी चौकशी करू शकतात. या घातपातात राजकीय अँगल आहे का ? घातपातामध्ये दुसऱ्या कोणत्या लोकांचा संबंध आहे का ? अशा प्रकारच्या चौकशीमध्ये प्रायव्हेट एजन्सीचा नक्कीच महत्त्वाचा रोल असतो.महाराष्ट्र सरकारने सीआयडी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र ती चौकशी सक्षम नाही, AAIB त्यांच्याशी डेटा सुद्धा शेअर करणार नाही.
माझ्यामते ही DGCA च्या अखताऱ्यात असलेली AAIB हीच एकमेव आहे. कारण त्यांच्याकडे त्याच्या प्रकारचे तंत्रज्ञान आहे.ही चौकशी झाल्यानंतर काही शंका उपस्थित झाल्या तर आपल्याकडे थर्ड पर्याय असतो, अमेरिका किंवा युनायटेड किंग्डम, वा फ्रान्स असेल. यांच्याकडे लेटेस्ट तंत्रज्ञान असलेल्या या संदर्भात ज्या कंपनी आहेत त्यांच्याकडून सुद्धा तपासला केला जाऊ शकतो.मात्र या घडीला DGCA ने AAIB च्या माध्यमातून चौकशी करणे महत्त्वाचं आहे असेही ढगे यांनी म्हटले आहे.