AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिमला, मनालीच्या धर्तीवर महाबळेश्वरचा विकास, 33 कोटींचा निधी मंजूर

महाबळेश्वर पर्यटन विकासासाठी 33 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. (Ajit Pawar sanctioned 33 crore for Mahabaleshwar tourism development)

सिमला, मनालीच्या धर्तीवर महाबळेश्वरचा विकास, 33 कोटींचा निधी मंजूर
ajit pawar
| Updated on: Feb 16, 2021 | 11:55 PM
Share

मुंबई : महाबळेश्वर पर्यटन विकासासाठी 33 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीद्वारे महाबळेश्वर बाजारपेठेतील रस्ते आणि गल्ल्यांचा सिमला, मनालीतील ‘मॉल रोड’च्या धर्तीवर विकास करण्यात येणार आहे. तसेच महाबळेश्वरमधल्या ऐतिहासिक इमारतींचं पुरातन सौंदर्य कायम ठेवून सुशोभीकरण, रस्त्यांवरील वीजवाहिन्या भूमीअंतर्गत करण्याची कामे, शहरात पर्यटन विकासासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांची निर्मिती या निधीमार्फत केली जाणार आहे. (Ajit Pawar sanctioned 33 crore for Mahabaleshwar tourism development)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. या बैठकीत  ही विकासकामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी दिले. कामे पूर्ण झाल्यानंतर महाबळेश्वरचे सौंदर्य अधिक खुलेल आणि पर्यटनवाढीला प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

महाबळेश्वरमधील विविध विकासकामे

महाबळेश्वर शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांची ‘मॉल रोड’च्या धर्तीवर सुधारणा करणार

शहरातील रस्ते रुंद करण्यात येतील.

त्यांची रंगसंगती आणि नामफलक एकाच पद्धतीचे असतील.

वीजवाहिन्या भूमीअंतर्गत करण्यात येतील.

पार्किंगची स्वतंत्र सोय करण्यात येईल.

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रात्रीच्या वेळेस दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात येईल.

शहरातील ऐतिहासिक पेटीट लायब्ररीचे नूतनीकरण करण्यात येईल.

अजित पवार यांनी महाबळेश्वरच्या विकासासाठी 33 कोटी 50 लाख रुपयांचा निधी तात्काळ उपलब्ध करुन दिला आहे, त्यामुळे आमदार मकरंद पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांचे आभार मानले.

या बैठकीला राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तामामा भरणे, आमदार मकरंद पाटील, बाळासाहेब भिलारे उपस्थित होते. (Ajit Pawar sanctioned 33 crore for Mahabaleshwar tourism development)

संबंधित बातम्या :

कोळीवाड्यांसाठी आदित्य ठाकरे धावले, गुजराती मतदारांपाठोपाठ कोळी मतदार वळवण्याचा प्रयत्न

माजी मंत्री राम शिंदेंना मिळाला कलेक्टर जावई, ‘व्हॅलेंटाईन डे’ला सुपारी फुटली

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.