AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता बारामतीत अजित पवार यांची एन्ट्री, ‘या’ दिवशी मतदारसंघ पिंजून काढणार; सुप्रिया सुळे यांची डोकेदुखी वाढणार?

आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळणार आहे. त्यातच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार गटाला मिळाल्याने, येणारी ही निवडणूक अधिकच चुरसीची होणार आहे. दोन्हीही पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनल्यामुळे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष या मतदार संघाकडे लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर बारामती मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे.

आता बारामतीत अजित पवार यांची एन्ट्री, 'या' दिवशी मतदारसंघ पिंजून काढणार; सुप्रिया सुळे यांची डोकेदुखी वाढणार?
ajit pawar in baramati
| Updated on: Feb 21, 2024 | 1:46 PM
Share

पुणे | 21 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पाडून अजित पवार यांनी बहुमताच्या जोरावर पक्ष आणि निवडणूक चिन्ह मिळविल्यानंतर आता बारामती कोण जिंकतंय याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागणार आहे. बारामती लोकसभा निवडणूक जिंकण ही अजित पवार यांच्यासाठी अत्यंत जिकीरीची गोष्ट बनली आहे. यावर अजित पवार याचं भवितव्य अवलंबून आहे. त्यातच बारामती लोकसभेत अजितदादा यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उतरविण्याची तयारी सुरु आहे. यातच आता लोकसभा निवडणूकीमध्ये बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळें विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवार यांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे.

अजितदादा पवार हे अत्यंत महत्वाकांक्षी नेते म्हणून ओळखले जातात. अजित पवार बारामतीत आपल्या बहिणीचा पराभव करण्यास उतरणार आहेत. यामुळे पवार कुटुंबातील ही लढत चुरसीची होणार आहे. अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्या पक्षात मोठी फूट पाडून महायुतीत सरकारात भागीदार झाले आहेत. या लोकसभा निवडणूकीत जास्तीजास्त जागा निवडून आणून भाजपाच्या गुडबुक मध्ये सामील होण्यासाठी अजित पवार साम, दाम, दंड, भेद अशी नीती वापरणार असल्याचे म्हटले जात आहे. अजित पवार यांनी बारामतीच्या मतदारांनी यावेळी गडबड केली पुन्हा माझ्याकडे कामं घेऊन येऊ नका असा दमच दिला आहे. लोक भावनिक आवाहन करतील, शेवटची निवडणूक म्हणतील असेही धाडसी विधान अजित पवार यांनी करून काकांची नाराजी ओढवून घेतली आहे.

मतदार संघ पिंजून काढणार

उपमुख्यमंत्री अजित पवार येत्या शनिवारी दि. 24 फेब्रुवारीला बारामती लोकसभा मतदार संघातील भोर आणि वेल्हा तालुक्याच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्या दरम्यान शनिवारी भोर आणि वेल्हा तालुक्यात राष्ट्रवादीकडून कार्यकर्ता आणि भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवार तालुक्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शनिवारी दुपारी 1 वाजता भोर तालुक्यातील नसरापूर येथे हा मेळावा घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मेळाव्याच्या नियोजनासाठी भोर तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची भोरमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयात बैठक पार पडली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते रणजित शिवतरे, भोरचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष घोरपडे, भालचंद्र जगताप, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली आहे.

भोर आणि वेल्हा तालुक्यात प्रचार

अजित पवार यांनी बारामती मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. ठिकठिकाणी सभा घेत भावनिक न होता मी सांगेल त्या उमेदवाराला निवडून आणण्याचे आवाहन अजित पवार करीत आहेत. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या बंडानंतर भोर आणि वेल्हा तालुक्यात 24 तारखेला पहिल्यांदाच अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याने, ते काय बोलतात याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती