AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अकोल्यात क्रूरतेचा कळस, कुत्रे सतत भुंकतात म्हणून विषारी औषध दिले, 25 कुत्र्यांचा मृत्यू

अकोला शहरातील गुडही भागात २५ पेक्षा जास्त कुत्र्यांचा विषबाधेने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात व्यक्तीने कुत्र्यांना विषारी पदार्थ देऊन मारले असल्याचा संशय आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ पसरली आहे.

अकोल्यात क्रूरतेचा कळस, कुत्रे सतत भुंकतात म्हणून विषारी औषध दिले, 25 कुत्र्यांचा मृत्यू
dogImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 04, 2025 | 12:44 PM
Share

अकोला शहरात एका माथेफिरूने क्रूरतेचा कळस गाठला आहे. कुत्रे सातत्याने भुंकतात, या कारणामुळे एका माथेफिरुने त्यांना विषारी औषध देऊन ठार मारल्याची घटना घडली आहे. यात तब्बल २५ हून अधिक कुत्र्‍यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर प्राणी प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या मृत श्वानांमध्ये मोकाट कुत्र्यांसह पाळीव कुत्र्यांचाही समावेश आहे.

तब्बल २५ हून अधिक कुत्र्यांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहराला लागून असलेल्या गुडधी भागात ही धक्कादायक घटना घडली. रस्त्याने जात असताना मोकाट कुत्रे आपल्या अंगावर भुंकतात. या क्षुल्लक कारणावरून एका अज्ञात व्यक्तीने या मुक्या प्राण्यांना खाण्यातून विषारी औषध दिले. विषारी अन्न खाल्ल्याने २४ तासांच्या आत तब्बल २५ हून अधिक कुत्र्यांचा मृत्यू झाला, तर काही कुत्र्‍यांची प्रकृती अजूनही गंभीर आहे.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संशय व्यक्त केला. या घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

अकोला शहरात हळहळ व्यक्त

उमरी प्रभागातील रहिवासी संदीप गावंडे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “ही अत्यंत निंदनीय घटना आहे. मुक्या प्राण्यांना अशा प्रकारे मारणे हे क्रूरतेचे लक्षण आहे. प्रशासनाने या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी.” अशी मागणी संदीप गावंडे यांनी केली आहे. या घटनेमुळे अकोला शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच मारेकऱ्याबद्दल नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. पोलीस आता या प्रकरणी काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन