Akola Fire : इमान शिवबाशी, वैर तुझ्याशी नी हा हा म्हणता म्हणता…
Ridhora Hotel Fire : अकोला जिल्ह्यातील एक घटनेची सध्या जोरदार चर्चा होत आहे. बाळापूर तालुक्यातील रिधोरा येथील या घटनेने समाज माध्यमावर धुमाकूळ घातला आहे. या घटनेत एका व्यक्तीचे मोठे नुकसान झाले. प्रकरणात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला जिल्ह्यातील एका घटनेची सध्या समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे. बाळापूर तालुक्यातील या घटनेने सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. रिधोरा येथील या घटनेने समाज माध्यमावर धुमाकूळ घातला आहे. एका व्यक्तीची राष्ट्रीय महामार्गालगतची हॉटेल अज्ञात व्यक्तीने जाळली आहे. पूर्व वैमनस्यातून हे कृत्य केल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्यात हॉटेल मालकाचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणात आतापर्यंत चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
शिवरायांची मूर्ती बाहेर काढली नि जाळली हॉटेल
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 लगत रिधोरा येथील एका छोट्या हॉटेलला आग लावल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे आग लावण्याआधी आरोपीने शिवरायांची मूर्ती हॉटेल बाहेर काढून बाजूला ठेवली आणि नंतर हॉटेलला आग लावली. यामध्ये हॉटेलचे नुकसान झाले. या प्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




तर अकोला-बाळापूर रस्त्यावर रिधोरा येथील पेट्रोल पंपाजवळ ही हॉटेल आहे. या हॉटेलजवळ दोन दिवसांपूर्वी हाणमारीची घटना घडली होती. दरम्यान, शुक्रवारी अज्ञात आरोपीने हॉटेल जाळल्याचे समोर आले. ही घटना पूर्व वैमनस्यातून झाल्याची माहिती समोर येत आहे.
शिवरायांची मूर्ती दुभाजकावर
अकोला ते खामगाव राष्ट्रीय महामार्गावर रिधोरा गावानजीक हे हॉटेल रस्त्या लगत आहे. बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे हॉटेल आहे. पूर्व वैमनस्यातून रेस्टॉरंट जाळण्यात आल्याचा आरोप हॉटेल मालकाने केला आहे. विशेष म्हणजे हॉटेल जाळण्यापूर्वी आरोपींनी हॉटेलमध्ये असलेली शिवरायांची मूर्ती दुभाजकावर आणून ठेवली आणि नंतर हॉटेलला आग लावली.
दोन दिवसांपूर्वी हॉटेल मालक आणि स्थानिक व्यक्तींमध्ये काही कारणावरून वाद उफळला होता. त्यानंतर हॉटेल जाळल्याची घटना घडली आहे. या वादातूनच ही घटना घडल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलिसांनी तक्रारीनंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पुढील तपास करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.