परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, पोलीस अधिकाऱ्याकडून पहिला गुन्हा दाखल

परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध 22 कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Akola police officer corruption complaint against Parambir Singh)

परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, पोलीस अधिकाऱ्याकडून पहिला गुन्हा दाखल
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सोमवारी हजर राहण्याचे चांदिवाल आयोगाचे आदेश
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 6:55 AM

अकोला : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध 22 कलमान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अकोल्याच्या पोलीस अधिकारी भीमराज घाडगे यांनी ही तक्रार केली आहे. (Akola police officer Bhimrao Ghadge corruption complaint against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh)

परमबीर सिंग यांच्यावर नेमका आरोप काय?

परमबीर सिंग यांच्या पत्नी यांचं इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. तिथे हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय चालवतो. तिथे देखील भ्रष्टाचाराचे पैसे गुतंवण्यात आले आहेत, असा आरोप भीमराज घाडगे यांनी केला आहे.

परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली, असा धक्कादायक आरोप अकोल्याच्या पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी केला आहे.

विशेष म्हणजे या पोलीस अधिकाऱ्याने काही दिवसांपूर्वी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवले होते. त्यानंतर काल रात्री उशिरा याबाबत अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात दाखल झालेला हा पहिला गुन्हा आहे.

जातीवाचक शिवीगाळ केल्याचा दावा

त्यासोबतच परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलिस अधिकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही भीमराज घाडगे यांनी यात म्हटलं आहे. यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस उपायुक्तांच्या डझनभर पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे, असा दावा भीमराज घाडगे केला आहे. तसेच परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होणार असल्याचे बोललं जात आहे. त्यात भ्रष्टाचारासह जातीवाचक शिवीगाळ आणि अन्य काही गंभीर प्रकरणांचा समावेश आहे, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.

अ‍ॅट्रॉसिटी कलमाद्वारे गुन्हा दाखल

या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी कलमाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह तब्बल 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल केला गेला आहे. हा गुन्हा दाखल करून हे प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्ण तपास ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Akola police officer Bhimrao Ghadge corruption complaint against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh)

संबंधित बातम्या : 

परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटींचा भ्रष्टाचार केला, अकोल्याच्या पोलीस अधिकाऱ्याचा गंभीर आरोप

Non Stop LIVE Update
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका
भटकती आत्मा... लोकसभेचा प्रचार तापला, मोदींची शरद पवारांवर सडकून टीका.
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय
मी निष्क्रिय खासदार मग मोदींची...ओमराजे यांचा पंतप्रधानांवर निशाणा काय.
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण
डोंबिवलीत उद्धव ठाकरे गटाला खिंडार, शहरप्रमुखच हाती घेणार धनुष्यबाण.
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी
राज्याचे महानालायक उद्धव ठाकरे, भाजपच्या बड्या नेत्यानं काढली लायकी.
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय
खैरेंच्या 'त्या' वक्तव्यावरून शिरसाटांचा निशाणा तर दानवेंचा पलटवार काय.
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
लोकसभेचं तिकीट मिळताच रवींद्र वायकरांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख
सुप्रिया सुळेंचा 'हा' लकी नंबर, प्रत्येक भाषणातून होतोय वारंवार उल्लेख.
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?
हे मटण खाणारे ब्राम्हण, देवेंद्र फडणवीसांवर कुणाचा निशाणा?.
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?
भुताटकी, आत्मा, ढोंग आणि बरंच काही..., राऊतांचा मोदींवर हल्लाबोल काय?.
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला
कॉलर उडवताना सकाळ की संध्याकाळ पहावं..., शरद पवारांचा उदयनराजेंना टोला.