AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात ‘तो’ कशासाठी? ठाण्यातला गुंड अयोध्येला धुवायला नेला? अंबादास दानवे यांचा सवाल

गुजरातला नेऊन वॉशिंग मशीन लावून गद्दार धुतले, आता याला पवित्र अयोध्येला कशाला नेलं? ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांचा सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात 'तो' कशासाठी? ठाण्यातला गुंड अयोध्येला धुवायला नेला? अंबादास दानवे यांचा सवाल
Image Credit source: tv9 marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Apr 10, 2023 | 12:24 PM
Share

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष लागलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknanth Shinde) यांच्या अयोध्या दौऱ्यावरून आता नव-नवीन आरोप होत आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ताफ्याने अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातच एक फोटो सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यावरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला जातोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यातील विमानात बसलेला एक फोटो जोरदार चर्चेत आहे. शिंदेंच्या ताफ्यात इतर आमदार-खासदारांसह सिद्धेश अभंगे या ठाण्यातील शिवसैनिकाचाही समावेश आहे. अभंगे याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याने मागील वर्षी शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यालाही पवित्र अयोध्येत धुवायला नेला होता का, असा सवाल आता शिवसेनेनं केलाय.

अंबादास दानवे आक्रमक

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विमानातल्या फोटोवरून सणसणीत सवाल केलाय. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना उद्देशून त्यांनी लिहिलंय… ‘ काय हा ‘फडतूस’पणा? अगोदर गुजरातला वॉशिंग मशीन लावून गद्दार धुतले. आता पवित्र अशा अयोध्येत मशीन लावून खून खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगे तेथे धुवायला नेलेला वाटतं. ते ही मुख्यमंत्री यांच्या विमानातून. आता हे तुम्हाला चालते का @Dev_Fadnavis जी? असा सवाल दानवे यांनी केलाय.

कोण आहे सिद्धू अभंगे?

ठाण्यातील कुख्यात गुंड अशी सिद्धू अभंगे याची ओळख आहे. मागील वर्ष मे महिन्यात, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीपूर्वी अभंगे याने शिवसेनेत प्रवेश केला होता. तत्पूर्वी डॉन असल्याच्या आविर्भावात सिद्धेश अभंगेचे व्हिडिओ युट्यूबवर व्हायरल झाले होते. युट्यूब भाई असं त्याला संबोधलं जात होतं. खंडणी, हत्येचा प्रयत्न, धमकावणे, धारदार हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे त्याच्या नावावर आहेत. तरीही वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत अभंगेचा युवासेनेत प्रवेश झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानात अभंगे दिसून आल्याने ठाकरे गटाने यावरून जोरदार टीका केली आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...