दिल्लीमध्ये भाजपच्या गोटात चिक्कार घडामोडी, आता पंकजा मुंडेही अमित शाह यांच्या कार्यालयात दाखल, नेमकं काय सुरुय?

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनंतर आज दिल्लीत (Delhi) घडामोडींना वेग आलाय. दिल्लीत भाजपच्या गोटात प्रचंड महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत.

दिल्लीमध्ये भाजपच्या गोटात चिक्कार घडामोडी, आता पंकजा मुंडेही अमित शाह यांच्या कार्यालयात दाखल, नेमकं काय सुरुय?
पंकडा मुंडे
Follow us
| Updated on: Jan 24, 2023 | 5:11 PM

नवी दिल्ली : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनंतर आज दिल्लीत (Delhi) घडामोडींना वेग आलाय. दिल्लीत भाजपच्या गोटात प्रचंड महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) गेल्या अनेक महिन्यांपासून रखडला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही म्हणून शिंदे गटातील (Shinde Group) आमदारांमध्ये धुसफूस असल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्या होत्या. विशेष म्हणजे काही आमदारांनी तर जाहीरपणे नाराजीदेखील व्यक्त केली होती. पण आता या आमदारांची नाराजी दूर होण्याची दाट शक्यता आहे. कारण राज्य मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तारावर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यासोबतच्या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज दिल्लीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे दिल्लीतील बैठकीसाठी महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते राजधानी दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराचा मुद्दा मोठा असला तरी भाजपकडून सहकार क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या बैठकीसाठी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी बोलावल्याचं सांगण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री वगळता भाजप नेत्या पंकजा मुंडे देखील आज दिल्लीत अमित शाह यांच्या कार्यालयात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अमित शाह यांच्या कार्यालयात महत्त्वाची बैठक

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील मुख्य कार्यालयात सहकार क्षेत्राशी संबंधित अतिशय महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलीय. याच बैठकीसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे दाखल झाल्या. त्यांच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अमित शाह यांच्या कार्यालयात दाखल होण्याआधी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यांच्यासोबत आमदार अभिमन्यू पवार, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, सुजय विखे पाटील हे अमित शाह यांच्या कार्यालयात दाखल झाले. साखर क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची बैठक मानली जात होती. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे अनेक ठिकाणी सहकार क्षेत्राची सूत्रे आहेत. त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर काही रणनीती आखली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सहकार क्षेत्राची बैठक संपल्यानंतर वेगळी बैठक

दुसरीकडे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सहकार क्षेत्राची बैठक संपल्यानंतर अमित शाह यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर खलबत होत असल्याची माहिती मिळत आहे. कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.