Maharashtra News Live : जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर

| Updated on: Jan 24, 2023 | 11:43 PM

Maharashtra Breaking News Live : राज्यातील दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra News Live : जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर

मुंबई: राज्यातील दिवसभरातील राजकीय, क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या घडामोडी लाइव्ह ब्लॉगमधून जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Jan 2023 10:49 PM (IST)

    औरंगाबाद शहरामध्ये अचानक अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता

    औरंगाबाद

    औरंगाबाद शहरामध्ये अचानक अवकाळी पावसाचा हजेरी,

    शहरातील पाऊस सुरू होताच अनके भागातील वीज प्रवाह खंडित

    अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता

  • 24 Jan 2023 10:16 PM (IST)

    वंचित आघाडी-शिवसेना युती देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरणार; अंबादास दानवे

    वंचित आघाडी-शिवसेना युती देशाच्या परिवर्तनाची नांदी ठरेल

    वंचित, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना युतीनंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगाबादेत जल्लोष

    वंचित आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची युती ही देशात नव्या परिवर्तनाची नांदी ठरणार

    सध्या देशात सामाजिक असंतोष निर्माण झाला आहे. त्याला नवी दिशा या युतीच्या माध्यमातून मिळणार

    युती राजकीय नव्हे तर सामाजिक परिवर्तन घडवणार या युतीमुळे विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली

  • 24 Jan 2023 10:08 PM (IST)

    नवी मुंबईत पहिल्यांदाच दोन कुत्र्यांचा विवाह; सानपाडा येथे सर्व विधीसह संपन्न

    नवी मुंबईत पहिल्यांदाच दोन कुत्र्यांचा विवाह

    रिओ आणि रिया या दोन कुत्र्यांचा विवाह नवी मुंबईतील गुणेंना सोसायटी सानपाडा येथे सर्व विधीसह संपन्न

    दोन्ही कुत्र्यांना लग्नासाठी असणारे सुंदर कपडे घालून हा विवाह पार पडला

    या लग्नाला वराडी म्हणून (मनुष्य) नातेवाईक मंडळी देखील उपस्थित राहिले होते.

    लग्न झाल्यानंतर प्रथेनुसार वरातदेखील काढण्यात आली

  • 24 Jan 2023 10:06 PM (IST)

    जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर

    अब्जाधीश गौतम अदानी यांना मोठा झटका

    गौतम अदानी आता जगातील चौथे श्रीमंत व्यक्ती

    अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस अदानी यांच्याऐवजी  तिसऱ्या स्थानी

    अदानी यांच्या संपत्तीत 683 दशलक्ष डॉलर्सची घट

    तर मुकेश अंबानी टॉप-10 च्या यादीतून बाहेर

    टॉप 15 मध्ये त्यांचा क्रमांक आता बारावा

    ब्लूमबर्ग बिलिनियर्स इंडेक्सने जाहीर केली आकडेवारी

    त्यांच्या संपत्तीत एकूण 120 अब्ज डॉलरची घसरण

    जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानी बर्नार्ड अरनॉल्ट

    त्यांची एकूण संपत्ती 188 अब्ज डॉलर

    तर एलॉन मस्क 145 अब्ज डॉलरसह या यादीत दुसऱ्या स्थानी

  • 24 Jan 2023 09:35 PM (IST)

    कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात महत्त्वाची बातमी

    लवकरात लवकर उमेदवार निश्चित करून नावं कळवा

    प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे मतदारसंघ निरीक्षक आमदार संग्राम थोपटेंना सूचना

    इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन नावं निश्चित केली जाणार

    काँग्रेसकडून उमेदवारांची माहिती गोळा करायला केली सुरुवात

    लवकरच काँग्रेसकडून उमेदवार जाहीर केलं जाणार

    इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात तयारी केली सुरू

    सूत्रांची माहिती

  • 24 Jan 2023 09:21 PM (IST)

    INDvNZ, 3rd ODI : न्यूझीलंडला पराभूत करत टीम इंडिया 1 नंबर, तिसऱ्या वनडेत 90 धावांनी विजय

    इंदूर : न्यूझीलंडला तिसऱ्या वनडेत पराभूत करत टीम इंडियाने 90 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंडलाही क्लीन स्वीप दिला आहे. इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 386 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र न्यूझीलंडचा 295 धावांवर बाजार उठला. दरम्यान एकदिवसीय मालिकेनंतर उभयसंघात टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे.

    सविस्तर बातमी : INDvsNZ, 3rd ODI : कुलदीप-शार्दूलची कमाल, टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 90 धावांनी शानदार विजय

  • 24 Jan 2023 09:11 PM (IST)

    राखी सावंतला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

    1 फेब्रुवारीपर्यंत कारवाईला स्थगिती

    बॉलीवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने केलेल्या तक्रार प्रकरणात दिलासा

    याचिकेवर 1 फेब्रुवारी रोजी सुनावणी

  • 24 Jan 2023 07:59 PM (IST)

    दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील शिवाजी रस्ता राहणार उद्या बंद

    उद्या गणेश जयंतीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोरील शिवाजी रस्ता राहणार बंद

    शिवाजी रस्त्यावरची वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात येणार

    गणेश जयंतीला होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक पोलिसांचा निर्णय

  • 24 Jan 2023 07:25 PM (IST)

    सीएनजी पंप चालक आक्रमक

    पुण्यात 27 जानेवारीपासून सीएनजी पंप चालक संपावर

    नफ्याचा मुद्या ऐरणीवर, पंप चालक आक्रमक

    कमिशनच्या मुद्यावरुन बेमुदत काळासाठी संपाचा इशारा

  • 24 Jan 2023 07:14 PM (IST)

    आरबीआयचा बँकांसह ग्राहकांना मोठा दिलासा

    बँकेच्या लॉकर कराराच्या नुतनीकरणाची मुदत वाढली

    करार नुतनीकरणाची डेडलाईन एक वर्ष वाढवली

    आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत करता येईल कराराचे नुतनीकरण

    यापूर्वी 1 जानेवारी 2023 पर्यंत नवीन अॅग्रीमेंट रिन्यू करण्याची होती मुदत

  • 24 Jan 2023 07:12 PM (IST)

    इशरत जहाँ एन्काऊंटर पुस्तकाचे लोकापर्ण पुढे ढकलले

    पोलिसांच्या विरोधानंतर संयोजकांची भूमिका

    कार्यक्रम पुण्यात होणार लवकरच आम्ही तारीख जाहीर करू

    मात्र आजचा कार्यक्रम आम्ही पुढे ढकलत असल्याची माहिती संयोजकांनी दिली

  • 24 Jan 2023 07:06 PM (IST)

    पठाण चित्रपटाविरोधात सांगलीत बजरंग दल आक्रमक

    चित्रपट रिलीज झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा

    सांगली आणि मिरजेतील सर्व चित्रपटग्रह चालकांना दिला इशारा

  • 24 Jan 2023 07:05 PM (IST)

    मुंबई : बनावट नोटांसह दोघांना अटक

    मुंबईतील मालवणी पोलिसांनी बनावट नोटांसह दोघांना अटक केली

    पोलिसांनी आरोपींकडून 19 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या

    आरोपी पालघरहून मुंबईत यायचे आणि बनावट नोटा चालवायचे

    फहिल इरफान शेख, मेहबूब नबीसाब शेख या आरोपींना अटक

  • 24 Jan 2023 07:01 PM (IST)

    मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर नियंत्रण सुटलेला ट्रेलर झाला आडवा, वाहनांच्या लांबच लांब रांगा

    पुणे :

    मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर नियंत्रण सुटलेला ट्रेलर झाला आडवा

    पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा

    पोलीस आणि आय आर बी कर्मचाऱ्यांकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू

  • 24 Jan 2023 07:00 PM (IST)

    पुणे : सीएनजी पंपावर लागली आग

    महापे शीळफाटा मार्गावरील ठाकूर पाडा येथील घटना

    सीएनजी भरण्यासाठी उभ्या असलेल्या रिक्षाने अचानक पेट घेतली

    रिक्षामधील एका गॅस बॉटलमध्ये बिघाड झाल्याने लागली आग

    आगीची झळ दुसऱ्या रिक्षाला देखील बसल्याने दोन रिक्षा जळून खाक

    यात मागील रिक्षा चालकाचा हात किरकोळ भाजला

  • 24 Jan 2023 06:10 PM (IST)

    राष्ट्रवादी हा पक्ष नाही तर ती टोळी; भाजपच्या गोपीचंद पडळकर यांची टीका

    ज्या अजित पवार यांना बारामतीने अनेकदा आमदार केले त्याच बारामतीवर त्यांनी अन्याय केला

    आजही दुष्काळ पडल्यानंतर बारामती तालुक्यातील 44 गावं टँकरसाठी पहिल्यांदा अर्ज करतात

    राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतीही वैचारिक बैठक नाही

    राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही अजेंडा ठरलेला नाही

    राष्ट्रवादी हा पक्ष नाही तर ती टोळी

    भाजपच्या गोपीचंद पडळकर यांची टीका

  • 24 Jan 2023 06:03 PM (IST)

    Icc Test Team Of The Year : ऋषभ पंत याचा 2022 वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघात समावेश

    टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याची आयसीसीने 2022 वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघात निवड केली आहे. विशेष म्हणजे या प्लेइंग इलेव्हनमध्ये ऋषभ पंतहा एकमेव भारतीय आहे. या बेस्ट टेस्ट टीमचं कर्णधारपद हे इंग्लंडच्या बेन स्टोक्सकडे देण्यात आलं आहे.

    सविस्तर बातमीसाठी खालील लिकंवर क्लिक करा

    Rishabh Pant : ऋषभ पंत याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

  • 24 Jan 2023 05:44 PM (IST)

    शेअर बाजारात गुंतवणूकदारांना दिलासा

    शेअर बाजारात मामूली तेजी

    सेंसेक्स 37 अंकांनी वधारला, 60,978 वर बंद

    मंगळवारी निफ्टी 18118 वरच ढेपाळला

    मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये 3.25 टक्क्यांची वाढ

    तज्ज्ञांच्या मते PSU स्टॉकमध्ये मिळेल तगडा रिटर्न

  • 24 Jan 2023 05:24 PM (IST)

    IND vs NZ, 3rd ODI : रोहित-शुबमनचा तडाखा, हार्दिकची फटकेबाजी, न्यूझीलंडसमोर 386 रन्सचं टार्गेट

    न्यूझीलंडला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजयासाठी टीम इंडियाने 386 धावांचं मजबूत आव्हान दिलं आहे. टीम इंडियाने 50 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 385 धावा केल्या. रोहित शर्मा आणि शुबमन गिल या दोघांनी सर्वाधिक 101 आणि 112 धावांची खेळी केली. तर याव्यतिरिक्त हार्दिक पांड्याने शेवटच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं.

    गिल, रोहित आणि हार्दिकची वादळी खेळी

    या मालिकेतील पहिले 2 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. यामुळे तिसरा सामना जिंकून टीम इंडियाकडे न्यूझीलंडला क्लीन स्वीप करण्याची संधी आहे. तर न्यूझीलंडचा हा सामना जिंकून शेवट गोड करण्याता प्रयत्न असेल.

    सविस्तर बातमीसाठी क्लिक करा खालील लिंकवर

    रोहित शर्मा आणि शुबमन गिलचा शतकी धमाका, न्यूझीलंडला विजयासाठी 386 धावांचे आव्हान

  • 24 Jan 2023 05:23 PM (IST)

    अमरावती ब्रेकिंग: कापूस दरवाढीसाठी आंदोलन

    अमरावतीच्या बहिरममध्ये कापूस आंदोलन स्मृती समितीचे कापूस दरवाढीसाठी आंदोलन

    कापूस जाळून शेतकरी करणार आंदोलन

    सरकारच्या शेतकरी धोरणाविरोधात आंदोलन

  • 24 Jan 2023 04:58 PM (IST)

    सहकार क्षेत्राशी संबंधित बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आणि अमित शाहांची वेगळी बैठक

    नवी दिल्ली : सहकार क्षेत्राची बैठक संपल्यानंतर अमित शाह यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर खलबत होत असल्याची माहिती मिळत आहे. कदाचित मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

  • 24 Jan 2023 04:43 PM (IST)

    सोन्याने गाठला नवीन उच्चांक

    सोन्याच्या किंमतींचा नवीन रेकॉर्ड

    सोन्याचे भाव 57,000 रुपयांच्या पुढे

    चांदीचा घसरणीला ब्रेक, आज भावात वाढ

    चांदीचा भाव आज 68,000 रुपयांच्या पुढे

    सोन्याचा भाव लवकरच 60,000 रुपयांचा टप्पा ओलांडणार असा तज्ज्ञांचा अंदाज

    वायदे बाजारात सोन्याच्या भावात 0.45 टक्क्यांची वाढ

    सोने आज 57071 रुपये प्रति 10 ग्रॅमवर

    तर चांदीच्या भावात 0.55 टक्क्यांची वाढ

    चांदी 68,340 रुपये प्रति किलोवर

  • 24 Jan 2023 04:15 PM (IST)

    उल्हासनगरात दोन गटात भर रस्त्यात हाणामारी

    नेताजी चौकातील घटना सीसीटीव्हीमध्ये झाली कैद

    पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल नाही

    भर रस्त्यात झालेल्या हाणामारीनंतर भीतीचे वातावरण

  • 24 Jan 2023 04:06 PM (IST)

    आम्ही कधीच कायदा मोडत नाही- शाम मानव

    धिरेंद्र बाबाला मिळालेल्या धमकीमागे आमचा हात नाही, शाम मानव यांची प्रतिक्रीया

    आमची संस्था शांततेच्या मार्गाने विरोध करते

    जोपर्यंत धिरेंद्र बाबा वैज्ञानिक रित्या स्वतःची चमत्कारीक शक्ती सिध्द करत नाहीत तो पर्यंत आम्ही टिका करत राहू

  • 24 Jan 2023 04:02 PM (IST)

    शिंदे-फडणवीस अमित शाहांच्या कार्यालयात दाखल

    पंकजा मुंडेही अमित शाहांच्या कार्यालयात दाखल

    शिंदे-फडणवीस यांची सहकार क्षेत्राबाबत बैठक होणार

    शिंदे-फडणवीस यांनी बैठकीआधीर रावसाहेब दानवे यांची भेट घेतली

    राज्यपालांचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार

  • 24 Jan 2023 03:37 PM (IST)

    Pune Live- कसबा आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात ठाकरे गटाची उद्या बैठक

    उद्धव ठाकरे उद्या दुपारी 1 वाजता मातोश्रीवर घेणार बैठक

    सचिन अहिर, संजय राऊत बैठकीला राहणार उपस्थित

    उद्या पोटनिवडणुकीसंदर्भात पक्षाची भूमिका ठरणार

  • 24 Jan 2023 03:18 PM (IST)

    अजित पवार मातोश्रीवर ठाकरे यांना भेटणार

    अजित पवार संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या घरी जाणार

    ठाकरे गटाच्या मित्रपक्षांना त्यांनी सांभाळून घ्यावं

    बीएमसी निवडणुकीत ठाकरे गटासोबत जाण्याची इच्छा

    राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली इच्छा

    सहा महिन्यांत राजकीय परिस्थिती बदलली - पवार

  • 24 Jan 2023 03:04 PM (IST)

    Entertainment News Live | ‘गांधी गोडसे’चे दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना जीवे मारण्याची धमकी

    राजकुमार संतोषी यांनी मुंबई पोलिसांकडे दाखल केली तक्रार

    पोलिसांकडे अतिरिक्त सुरक्षेची केली मागणी, वाचा सविस्तर

  • 24 Jan 2023 03:02 PM (IST)

    सत्ताधीशांनी स्वतः पेक्षा जनतेची काळजी करावी; नाना पटोले यांची भाजपवर टीका

    आमचे मित्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री

    आता त्यांना प्रत्यय आला की त्यावेळी त्यांना जेल मध्ये टाकणार होते

    ते विधानसभेत म्हणतात की मी बदला घेतला

    हे सगळे प्रश्न ते प्रशांच्या जागी

    व्यक्तिगत सुरक्षा या सगळ्यांच्या असल्या पाहिजे

    पण जे स्वप्न दाखवून भाजप सत्तेत आलं त्या बद्दल का बोललं जातं नाही

    काल त्यांचा इंटरव्ह्यू मी बघितला

    मला वाटलं ते शेतकरी, महागाई बद्दल बोलतील

    पण ते स्वतः बद्दलच बोलत होते

    सत्ताधीशांनी स्वतः पेक्षा जनतेची काळजी करावी

    राज्यपालांनी महापुरुषांचा अपमान केला त्या बद्दल बोललं जातं नाही जनतेचे मूळ मुद्दे डायव्हर्ट करण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न

  • 24 Jan 2023 03:00 PM (IST)

    Entertainment News Live | प्रदर्शनापूर्वीच शाहरुखच्या 'पठाण'ने मोडला हृतिकच्या 'वॉर'चा रेकॉर्ड

    पहिल्या वीकेंडसाठी पठाणची जोरदार ॲडव्हान्स बुकिंग

    पहिल्या वीकेंडसाठी झालेल्या ॲडव्हान्स बुकिंगमधून पठाणची 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई, वाचा सविस्तर

  • 24 Jan 2023 02:52 PM (IST)

    KL Rahul-Athiya wedding: विराट बिझी, पण अनुष्का राहुलच्या लग्नाला का गेली नाही? समोर आलं कारण

    विराट-राहुल, अनुष्का-आथिया यांच्यात चांगली मैत्री आहे. पण अनुष्का लग्नाला का उपस्थित नव्हती. वाचा सविस्तर....

  • 24 Jan 2023 02:43 PM (IST)

    राजधानी नवी दिल्लीत भूकंपाचे झटके

    जवळपास दोन ते अडीच मिनिट जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के

    भूकंपाची तीव्रता अद्याप स्पष्ट नाही

    अनेक भागात भूकंप जाणवल्याची माहिती

  • 24 Jan 2023 02:40 PM (IST)

    Pune Live- कसबा, पिंपरी चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीत आता AIMIM ची उडी

    दोन्ही विधानसभा निवडणुक संपूर्ण ताकदीने लढवणार

    दोन्ही मतदार संघात AIMIM उमेदवार देणार

    खासदार इम्तियाज जलील यांचा नेतृत्वात पक्ष निवडणूक लढवणार

    पुण्यात बैठक घेत AIMIM चा निर्णय

  • 24 Jan 2023 02:40 PM (IST)

    मंत्री दादा भुसे यांच्या ईडी चौकशीची मागणी

    बदल्या, पदोन्नतीत भ्रष्टाचार झाल्याचा प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी सेलचे उपाध्यक्ष वसंत मुंडे यांचा आरोप

    माहिती अधिकाराखाली मागविलेल्या माहितीतून हे उजेडात आल्याचा मुंडेंचा दावा

    यासंदर्भात ईडी, सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आणि लोकपालांकडे तक्रार

    भुसेंची चौकशी करून मालमत्ता जप्त करावी, तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मुंडेंची मागणी

  • 24 Jan 2023 02:20 PM (IST)

    Pune Live- सिंहगड पोलीस स्टेशन हद्दीत गोळीबार 

    गोळीबारात एकजण गंभीर जखमी

    सिंहगड पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर भर दिवसा गोळीबार

    पोलीस घटनास्थळी दाखल

    शहरात 24 तासात गोळीबाराची दुसरी घटना

    कालच पुण्यातील येरवडा भागात देखील अज्ञातंकडून करण्यात आला होता गोळीबार

  • 24 Jan 2023 02:11 PM (IST)

    कोपरगाव / अहमदनगर

    उल्कासदृश्य वस्तू छत तोडून थेट घरात

    सदर उल्का सदृष्य वस्तू घराचा पत्रा तोडून जमिनीवर आदळली

    मोठा आवाज झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण

    सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा नाही

    कोपरगाव तालुक्यातील भोजडे चौकी येथील घटना

    किरण ठाकरे यांच्या घरात आढळली उल्कासदृश्य वस्तू

    कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पो.नि सुरेश आव्हाड यांनी भेट देत सदर वस्तू घेतली ताब्यात

    तहसीलदार यांच्यामार्फत ही वस्तू खगोलशास्त्र विभागाकडे पाठवणार

  • 24 Jan 2023 02:00 PM (IST)

    साईबाबांचे व्हिआयपी दर्शन घडवून देणाऱ्या बोगस पीए आणि एजंटाना बसणार चाप

    आजी-माजी आमदार, खासदार तसेच विश्वस्तांच्या पीएना मंदिर परिसरात नो एन्ट्री

    दररोज व्हिआयपी दर्शन घडवण्यासाठी असते लगबग

    यापुढे आजी-माजी मंत्री , आमदार, खासदार आणि विश्वस्तांच्या अधिकृत स्विय सहाय्यकाकडून संस्थानला द्यावे लागणार पत्र

    या निर्णयामुळे साईभक्तांची लूट थांबणार

    भाविकांची व्हिआयपी दर्शनाच्या नावाखाली होत होती आर्थिक लूट

    प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाचा गैरवापर देखील थांबणार

    व्हिआयपी दर्शन घडवणाऱ्या संस्थान कर्मचाऱ्यांवरही होणार कठोर कारवाई

    साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी जारी केले आदेश

  • 24 Jan 2023 02:00 PM (IST)

    पुणे विधानसभा पोटनिवडणूक, काँग्रेसचा मास्टर प्लॅन तयार,भाजप-राष्ट्रवादी कुठे?

    कसबा व पिंपरी चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची आशा धुसर झाली आहे. महाविकास आघाडीने निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यानंतर आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी वक्तव्य केले आहे...वाचा सविस्तर

  • 24 Jan 2023 01:42 PM (IST)

    Rashid Khan ची कमाल, T20 मध्ये बनला किंग, वयाच्या 24 व्या वर्षी मोठा रेकॉर्ड

    T20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा Rashid Khan पहिला स्पिन बॉलर ठरलाय. वाचा सविस्तर....

  • 24 Jan 2023 01:16 PM (IST)

    IND vs NZ 3rd ODI : न्यूझीलंडने टॉस जिंकला, अशी आहे टीम इंडियाची Playing 11

    IND vs NZ 3rd ODI : टीम इंडिया आज जिंकली, तर मिळेल मानाच स्थान....वाचा सविस्तर...

  • 24 Jan 2023 01:10 PM (IST)

    Live Update- राज्यात विविध विभागांच्या पदभरती रखडल्या

    जिल्हा परिषद, आरोग्य विभाग फेरपरीक्षा, शिक्षक पदभरती, तलाठी पदभरती, नगरविकास भरती, वनविभाग, एम आय डीसी

    या सरळसेवा पदरभरती रखडल्या जाहीरात निघत नसल्यानं विद्यार्थी नाराज

    लवकरात लवकर घोषणा केलेली 75 हजार जागांची भरती करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलनाचा विद्यार्थ्यांचा इशारा...

  • 24 Jan 2023 01:10 PM (IST)

    अहमदनगरला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची महाराष्ट्र केसरी स्पर्धा लवकरच होणार

    पुणे : रविवारी शरद पवारांसोबत झाली बैठक,

    सचिव बाळासाहेब लांडगे होते बैठकीला उपस्थित,

    पत्रकार परिषद घेऊन लवकरच नगरच मैदान जाहीर करणार,

    पवार गटाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा नगरला होणार,

    सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती.

  • 24 Jan 2023 12:53 PM (IST)

    तापमानातील बदलाचा आंब्यावर परिणाम

    तापमानातील बदलामुळे आंब्याचे उत्पादन कमी होणार

    आंबा यंदा भाव खाणार

    कोकणातील शेतकरी संकटात

  • 24 Jan 2023 12:04 PM (IST)

    कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

    राष्ट्रवादी पाठोपाठ आता उद्धव ठाकरे गटानेही केली कसब्यातून निवडणूक लढवण्याची तयारी,

    कसब्याची जागा उद्धव ठाकरे गटाला देण्याची माजी नगरसेवक विशाल धनवडे यांची मागणी,

    स्वतः विशाल धनवडे कसब्यातून निवडणूक लढवण्यास इच्छुक,

    राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांचीही निवडणूक लढवण्याची तयारी.

  • 24 Jan 2023 12:03 PM (IST)

    उद्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पार पडणार गणेश जन्म सोहळा

    पुणे : सोन्याच्या पाळण्यात होणार जन्माचा सोहळा,

    2 किलो 80 ग्रॅम सोनं, 8.5 किलो चांदी, पाच फुट उंचीचा सागवानी हा पाळणा असणार आहे,

    उद्या दुपारी 12 वाजता पार पडणार सोहळा.

  • 24 Jan 2023 11:57 AM (IST)

    बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी अखेर गजाआड

    बनावट लग्न लावून पैसे उकळणारी टोळी अखेर गजाआड

    पाच महिलासह आठ जणांना अटक

    कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड पोलिसांची कारवाई

    विवाह इच्छुक तरुणांचा बनावट नवरीशी लग्न लावून देवून त्याची आर्थिक लूट करणाऱ्या राज्यव्यापी टोळीचा पर्दाफाश

    कुरुंदवाड परिसरातील दोन युवकांना लाखो रुपयांचा चुना लावल्याची तक्रार आली होती समोर

    टोळीने राज्यभरात अनेकांना गंडा घातल्याचा अंदाज

  • 24 Jan 2023 11:52 AM (IST)

    Mumbai News Live: ईडी अधिकाऱ्यांची तोतयागिरी करून झवेरी बाजार परिसरात व्यावसायिकाच्या कार्यालयावर टाकला छापा

    4 अज्ञात व्यक्तींनी छापा टाकून कार्यालयातून 25 लाख रुपये रोख आणि 1.70 कोटी रुपये किंमतीचं 3 किलो सोनं नेलं

    याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल

    सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न

  • 24 Jan 2023 11:46 AM (IST)

    Pune Live- कसबा पोटनिवडणुकीत मनसेची भूमिका काय ?

    उद्या शिवतीर्थावर राज ठाकरेंसोबत होणार बैठक

    बैठकीत कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात होणार चर्चा

    मनसे बिनविरोध करण्यासाठी पाठिंबा देणार की जागा लढवणार

    उद्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे चर्चा करणार असल्याची सूत्रांची माहिती

    मनसेच्या गोटातही हालचाली सुरू

  • 24 Jan 2023 11:40 AM (IST)

    भयानक, कुत्र्याला कुत्रा म्हटलं म्हणून एकाला जीवानिशी संपवलं

    या घडलेल्या प्रकाराने सगळेच हादरुन गेलेत. वाचा सविस्तर....

  • 24 Jan 2023 11:28 AM (IST)

    नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी यार्ड मधील कैद्याने केली तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण

    नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी यार्ड मधील कैद्याने केली तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण

    कैद्याने सामान्य कपडे घातले असल्याने कैद्यांचे चे कपडे घालायला सांगितले म्हणून त्याने मारहाण केल्याची माहिती

    साहिल अजमल काळसेकर असे कैद्यांचे नाव असून त्याला रत्नागिरी कोर्टाने जन्मठेप ची शिक्षा सुनावली

    तो नागपूर जेल मध्ये भोगत आहे शिक्षा

    त्याला फाशी यार्ड मध्ये ठेवण्यात आलं आहे

    या प्रकरणी नागपूरच्या धंतोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला

    या घटनेमुळे नागपूर जेल मध्ये खडबड उडाली असून नागपूर जेल पुन्हा चर्चेत आल..

  • 24 Jan 2023 11:06 AM (IST)

    केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल

    केंद्रीय मंत्रिमंडळातून ११ मंत्र्यांना मिळणार डच्चू

    राज्यातून शिंदे गटाला मिळणार संधी

    मोदी मंत्रिमंडळाचा २०२४ च्या निवडणुकीपुर्वी शेवटचा विस्तार

  • 24 Jan 2023 10:39 AM (IST)

    सोन्याची तुफान बॅटिंग, भाव कडाडले

    वायदे बाजारात सोन्याचा भाव आज 57,000 रुपये

    मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर किंमतीत 215 रुपयांची वाढ

    गेल्या सत्रात सोन्याचा भाव 56,815 रुपयांवर बंद

    सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात घसरण

    सोमवारी सोन्याचा भाव 56,840 रुपये 10 ग्रॅम होता

  • 24 Jan 2023 10:34 AM (IST)

    आयडीबीआय बँकेला तिमाहीत जबरदस्त नफा

    केंद्र सरकार बँकेच्या विक्रीच्या तयारीत

    आयडीबीआयच्या नफ्यात 60 टक्क्यांची वाढ

    बँकेचा नफा वाढून तो 927 कोटी रुपये झाला

    डिसेंबरच्या तिमाहीची आकडेवारी बँकेने केली जाहीर

    यापूर्वी आयडीबीआय बँकेने 578 कोटी रुपयांचा नफा मिळवला होता

  • 24 Jan 2023 10:33 AM (IST)

    सत्यजित तांबे म्हणजे औरंजेब; कुणाची टीका?

    औरंगजेब प्रमाणे यांनी देखील वडिलांना खुर्चीवरून खाली खेचलं

    स्वराज्य संघटनेच्या उमेदवाराचा सत्यजित तांबेंवर घणाघात

    भाजपकडेच नाही तर आम्ही सगळ्या पक्षांकडे मदत मागणार

    छत्रपती संभाजी महाराज राजकारणाची दिशाच बदलणार

  • 24 Jan 2023 10:31 AM (IST)

    मुंबई विमानतळावर अडीच किलो सोने जप्त

    कस्टम विभागाने मुंबई विमानतळावर मोठी कारवाई केली

    अडीच किलो सोने व डॉलर केले जप्त

    90,000 USD आणले होते पुस्तकात लपवून

    अंडरगारमेंटमध्ये लपवून ठेवलेले पेस्ट स्वरूपात अडीच किलो सोने जप्त

  • 24 Jan 2023 10:28 AM (IST)

    Live Shivsena | धनुष्यबाण चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय 30 जानेवारीला

    निवडणूक आयोग देणार अंतिम निर्णय, सूत्रांची माहिती

    30 जानेवारीला दोन्ही गटांचा युक्तिवाद होणार नाही

    30 जानेवारीपर्यंत फक्त शिंदे गट लेखी उत्तर सादर करणार

    ठाकरे गट कोणतही लेखी उत्तर निवडणूक आयोगाला सादर करणार नाही, सूत्रांची माहिती

    30 तारखेच्या निर्णयाकडे राज्याचं लक्ष

  • 24 Jan 2023 10:19 AM (IST)

    बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री भारत जोडो यात्रेत होणार सहभागी

    बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर जम्मू येथे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहे. उर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसमधूनर राजकारणात प्रवेश केला होता. काँग्रेसच्या तिकीटवर त्यांनी मुंबईतून लोकसभेची निवडणूक लढवली होती. आता त्या शिवसेनेमध्ये आहेत.

  • 24 Jan 2023 10:18 AM (IST)

    लडाखचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांची उपोषणाची प्रॅक्टीस सुरू

    वांगचुक यांनी प्रजासत्ताक दिनी खार्दुंगला पास येथे पाच दिवसांचे लाक्षणिक उपोषणाची केली होती घोषणा

    तयारीसाठी लडाखमधील एका मोकळ्या जागेवर -20 डिग्री सेल्सिअस तापमानात झोपल्याचा व्हिडिओ शेअर

    "मी जिवंत आहे." खारदुंग ला चे तापमान -40°C पर्यंत घसरले आहे, असे ट्वीट सोनम वांगचुक यांनी केले आहे

    पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील लडाखचा राज्यघटनेच्या ६ व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची त्यांची मागणी

  • 24 Jan 2023 10:17 AM (IST)

    पाकिस्तानच्या 'या' प्रसिद्ध क्रिकेटपटूचा कोचच्या मुलीसोबत 'निकाह'

    केएल राहुलप्रमाणे पाकिस्तानातही एक क्रिकेटपटू विवाहबद्ध. वाचा सविस्तर....

  • 24 Jan 2023 10:16 AM (IST)

    IND vs WI - स्मृती मांधना-हरमनप्रीतने वेस्ट इंडिजला लय धुतलं, 4 वर्षापूर्वीची स्टोरी रिपीट

    दोघींच्या सरस बॅटिंगमुळे वेस्ट इंडिजचा मोठा पराभव. वाचा सविस्तर....

  • 24 Jan 2023 10:01 AM (IST)

    अॅमेझॉनची भारतातील पहिली एअरकार्गो लाँच

    जलद डिलिव्हरी देण्यासाठी Amazon ने भारतात आपली हवाई सेवा सुरू केली

    अॅमेझॉन आपल्या डिलिव्हरी सेवेसाठी बोईंग 737-800 विमानाचा वापर करणार

    भारतीय बाजारपेठेत दोन मालवाहू विमानाद्वारे प्रत्येकी 20,000 पॅकेजेसची डीलीव्हरी शक्य

    हे मालवाहतूकीचे विमान मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, दिल्ली या शहरांना डीलीव्हरी करणार

  • 24 Jan 2023 09:39 AM (IST)

    Entertainment News Live: राम गोपाल वर्माकडून RRR चे दिग्दर्शक राजामौली यांना जीवे मारण्याची धमकी

    राम गोपाल वर्माने ट्विट करत एस. एस. राजामौलींना दिली धमकी

    दारूच्या नशेत ट्विट करत असल्याचं लिहिलं, वाचा सविस्तर..

  • 24 Jan 2023 09:36 AM (IST)

    पुण्यातील भीमा नदीत सापडले पाच दिवसात चार मृतदेह

    पुणे : मृतदेह एकच कुटुंबातील असण्याची शक्यता,

    दौंड तालुक्यातील भीमा नदीपात्रात सलग चार दिवस चार मृतदेह सापडल्याने खळबळ,

    दिनांक १८ ते २२ या दरम्यान हे मृतदेह सापडले आहेत.

    सर्व मृतदेह ३८ ते ४५ या वयोगटातील,

    या मृतदेहांमध्ये दोन पुरुष आणि दोन स्त्रियांचा समावेश.

  • 24 Jan 2023 09:01 AM (IST)

    Pune Live- पुण्यात आता चक्क झाडांना क्यूआर कोड

    आता झाडेच सांगतील स्वतःची माहिती आणि इतिहास

    पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये 850 वृक्षांना लावण्यात आले क्यूआर कोड

    वृक्ष देणार एका क्लिकवर स्वतःची माहिती

    झाडावर लावलेला क्यूआर कोड स्कॅन करा आणि मिळवा त्या वृक्षाची पूर्ण माहिती

  • 24 Jan 2023 08:52 AM (IST)

    हैदोस घालणाऱ्या तृतीयपंथीयांविरोधात होणार कारवाई 

    - जबरदस्तीने पैसे मागीतल्यास तृतीयपंथीय होणार तडीपार
    - जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या किन्नरांवर कारवाईचे नागपूर पोलीस आयुक्तांचे आदेश
    - निमंत्रणाशिवाय किन्नर लग्नात पैसे मागायला गेल्यास होणार गुन्हा दाखल
    - नागपूर पोलीसांची शहरातील ४८ तृतीयपंथीयांना १४४ ची नोटीस
    - हैदोस घालणाऱ्या तृतीयपंथीयांविरोधात होणार कारवाई
    - नागपुरात तृतीयपंथीयांविरोधात क्राईम ब्रॅंचची मोहिम
  • 24 Jan 2023 08:50 AM (IST)

    गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील 43 पंचनाम्याची यादी न्यायालयात सादर

    कोल्हापूर : गुन्ह्याचे ठिकाण मृतदेहाचा पंचनामा तसंच संशयीतांच्या घराच्या झाडाझडती मधील पंचनाम्याचा समावेश,

    विशेष सरकारी वकील ॲड शिवाजीराव राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयासमोर सादर केले पंचनामे,

    आता प्रकरणाची पुढील सुनावणी 7 फेब्रुवारीला होणार,

    पुढील सुनावणीला विशेष सरकारी वकील ऍड हर्षद निंबाळकर युक्तिवाद करणार.

  • 24 Jan 2023 08:50 AM (IST)

    हिंजवडी पोलिस स्थानकाच्या हद्दीत कोयता हातात घेवून स्टेटस ठेवणे दोघांना चांगलेच महागात पडलय

    -पुण्यात कोयता गँग वर कडक कारवाई सुरू असताना आता पिंपरी चिंचवड मध्ये ही पोलिसांनी कोयता बाळगणाऱ्यावर धडक कारवाई सुरू केलीय

    -हिंजवडी पोलिस स्थानकाच्या हद्दीत कोयता हातात घेवून स्टेटस ठेवणे दोघांना चांगलेच महागात पडलय

    -दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दोघांनी हात जोडून आमची चूक झाल्याचा व्हिडिओ प्रसारित केलाय

    -दरम्यान कोयता पकडुन देणाऱ्या पोलिस स्थानकाला ऐक गुण दिला जाणार आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिस स्थानकाची नोंद ठेवली जाणार आहे

  • 24 Jan 2023 08:50 AM (IST)

    कच्चा तेलाचे भाव कडाडले

    भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ ?

    ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत आज 0.64 टक्के वाढ

    ब्रेंट क्रूड ऑईलचा आजचा भाव 88.19 डॉलर प्रति बॅरल

    डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये 0.01 टक्के वाढ,

    डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलचा आजचा भाव 81.63 डॉलर प्रति बॅरल

    मुंबईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर

    अहमदनगर पेट्रोल 105.96 रुपये तर डिझेल 92.49 रुपये प्रति लिटर

    अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर,

    अमरावतीत 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर

    औरंगाबाद 108 पेट्रोल आणि डिझेल 95.96 रुपये प्रति लिटर

    नागपूरमध्ये पेट्रोल 106.03 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर

    नाशिकमध्ये पेट्रोल 106.76 रुपये आणि डिझेल 93.26 रुपये प्रति लिटर

    कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.10 आणि डिझेल 92.65 रुपये प्रति लिटर

    पुण्यात पेट्रोलचा भाव 105.98 आणि डिझेल 92.50 रुपये प्रति लिटर

  • 24 Jan 2023 08:42 AM (IST)

    भीमा केसरी स्पर्धेसाठी आज दिग्गज पैलवान कुस्तीच्या फडात

    - भीमा केसरी स्पर्धेसाठी आज दिग्गज पैलवान कुस्तीच्या फडात

    - यामध्ये उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड, पैलवान सिकंदर शेख, तसेच हरियाणा, पंजाबसह मातब्बर पैलवान आज कुस्तीच्या फडात उतरणार आहेत.

    - खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भीमा केसरी कुस्ती स्पर्धा भरवण्यात आल्यात.

    - पंढरपूर तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यामध्ये या कुस्त्या भरवण्यात आल्या आहेत

    - पैलवान महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्या कुस्तीवरून आरोप प्रत्यारोप झाले होते

    - त्यानंतर आज महेंद्र आणि सिकंदर पहिल्यांदाच कुस्तीच्या फडात दिसणार आहेत

    - महेंद्र आणि सिकंदर यांच्यात कुस्ती होणार नसली तरी राष्ट्रीय पातळीवरील अनेक पैलवानांसोबत त्यांची कुस्ती होणार आहे

  • 24 Jan 2023 08:41 AM (IST)

    गौतमी पाटील हिच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

    -नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यावर प्रतिभा शेलार यांनी तक्रार केल्यानंतर सातारा कोर्टाचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश.-

    -सातारा पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रसिद्ध नृत्यांगणा मृणाल कुलकर्णीची पहिली प्रतिक्रिया-गौतमी वर केली चौफेर जोरदार टीका-

    -गुन्हा दाखल झाल्याचं वाईट वाटतंय मात्र लोकांनी ही आपल्या नृत्यावर आक्षेप घेऊ नयेत.जेणे करुन लोक कलावंतीवर गुन्हा दाखल होण्याची दुर्देवी वेळ गौतमीवर आलीय-

    -अश्लिल हावभाव करणे ,लोकांना घाणारडे हातवारे करणे,शार्ट कपडे घालणे हे असले प्रकार लोककलेत व लावणीत येतच नाहीत.-

    -लावणीकडे बघण्याचा महिलांचा दृष्टीकोन बदलत असताना गौतमीने लावणीची संस्कृती जपावी-

    -गौतमीने माफी मागितली नृत्यामधुन अश्लिल प्रकार कार्यक्रमात माझ्याकडुन होणार नाहीत.असे सांगीतले जरी असले तरी मात्र तिच्याकडुन पुन्हा तेच घडतंय.याला आळा घालणं गरजेचे आहे-

    -तिच्या नृत्यांचा व कार्यक्रमाचा आम्हा राज्यभरातील कलाकरांना त्रास होता कामा नये.तिच्यामुळे राज्यभरातील लोककलेच्या कार्यक्रमावर बंदी येईल.ज्याचं जगणंच लावणीवर आहे.त्यांनी मग कसं जगायचं.

  • 24 Jan 2023 08:40 AM (IST)

    Mumbai News Live | राखी सावंतच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

    राखी सावंतच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

    मॉडेल शर्लिन चोप्राने दाखल केली होती तक्रार

  • 24 Jan 2023 08:25 AM (IST)

    KL Rahul-Athiya Wedding : लग्नाच रिसेप्शन इतक्यात नाही, मग कधी? सुनील शेट्टीने दिली माहिती

    केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नाच रिसेप्शन कधी होणार? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. वाचा सविस्तर....

  • 24 Jan 2023 08:07 AM (IST)

    औरंगबादमध्ये कॉल सेंटरवर धमक्या आणि शिव्यांच्या फोननंतर शस्त्र सापडले

    औरंगबादमध्ये कॉल सेंटरवर धमक्या आणि शिव्यांच्या फोननंतर शस्त्र सापडले

    पोलिसांनी कॉल सेंटरवर छापा टाकल्यानंतर सापडले तलवारी ,चाकू आणि एअरगन

    देहरादून येथील सायबर सेलने केलेल्या कारवाईत औरंगाबादमधील कॉल सेंटर समोर

    वेळेत कर्ज न भरणाऱ्यांना या कॉल सेंटरमधून दिल्या जायच्या धमक्या, ब्लॅकमेल आणि शिव्या

    क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • 24 Jan 2023 08:06 AM (IST)

    Oscar 2023 कडे संपूर्ण जगाचं लक्ष; कधी होणार नॉमिनेशनची घोषणा ?

    भारतीयांसाठी Oscar 2023 अत्यंत खास; RRR सिनेमा देखील ऑस्करच्या शर्यतीत सामील

    सिनेविश्वातील सर्वात मानाचा समजला जाणार पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर... वाचा सविस्तर

  • 24 Jan 2023 08:05 AM (IST)

    International News Live: उत्तर कॅलिफोर्नियातील हाफ मून बे याठिकाणी गोळीबार

    उत्तर कॅलिफोर्नियातील हाफ मून बे याठिकाणी गोळीबार

    गोळीबारात सात जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

    पोलिसांनी संशयिताला घेतलं ताब्यात

  • 24 Jan 2023 07:53 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायत सदस्यांचे पद धोक्यात

    अमरावती : निवडणूक विभागाकडे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची दोन वर्षांची मुदत संपली,

    शासनाने दिले कारवाईचे आदेश, जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांची माहिती मागितली,

    जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत संपली 17 जानेवारीला,

    2021 मध्ये अमरावती जिल्ह्यात पार पडल्या होत्या 552 ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूका,

    कोरोना असल्याने तेव्हा जात वैधात प्रमाणपत्रात दिली होती सूट.

  • 24 Jan 2023 07:52 AM (IST)

    KL Rahul-Athiya Wedding – राहुलच्या आईची रॉयल एंट्री, इतक्या कोटीच्या कारमधून आली लग्नमंडपात

    KL Rahul-Athiya Wedding – राहुलच्या आईने ज्या कारमधून एंट्री केली, त्याची किंमत ऐकून डोळे विस्फारतील. वाचा सविस्तर.....

  • 24 Jan 2023 07:47 AM (IST)

    पुणे महानगरपालिकेत आशा सेविकांची 74 टक्के पदे रिक्त

    पुणे महानगरपालिकेत आशा सेविकांची 74 टक्के पदे रिक्त

    शहरात 1124 आशा वर्करची पदे, मंजूर मात्र प्रत्यक्षात 298 आशा वर्कर

    रिक्त पदे भरा यासाठी अशा सेविकांचे 25 जानेवारी रोजी पुण्यात मोठे आंदोलन

    तुटपुंजे मानधन दिले जात असल्याचा देखील आशा सेविकांचा आरोप

  • 24 Jan 2023 07:41 AM (IST)

    येत्या प्रजासत्ताक दिनी एसटीच्या 780 विनाअपघात सेवा देणाऱ्या चालकांचा सत्कार

    एसटी महामंडळाच्या तब्बल 780  चालकांचा त्यांनी विनाअपघात बजावलेल्या सेवेबद्दल येत्या प्रजासत्ताक दिनी खास गौरव होणार.

    25 वर्षे किंवा जास्त कालावधीत कोणताही अपघात न करता एसटीची सेवा केलेल्यांचा त्यात समावेश आहे.

    एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातर्फे प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देण्यात येणार आहे

  • 24 Jan 2023 07:39 AM (IST)

    Entertainment News Live: दाक्षिणात्य अभिनेता सुधीर वर्माची आत्महत्या

    दाक्षिणात्य अभिनेता सुधीर वर्माची आत्महत्या

    विशाखापट्टणममधील राहत्या घरी केली आत्महत्या

    आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट

Published On - Jan 24,2023 7:38 AM

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.